Pune Crime : पुण्यातील कोंढव्यात मजूर म्हणून काम, पोलिसांना कुणकुण; धाड टाकून ४ बांगलादेशींना शहरातून अटक

Pune Four Bangladeshis Arrested : पुणे शहरात बेकायदेशीरपणे वास्तव करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये चार बांगलादेशी बेकायदेशीरपणे पुणे शहरात वास्तव करत होते.
Pune Four Bangladeshis Arrested
Pune Four Bangladeshis ArrestedSaam Tv News
Published On

अक्षय बडवे, साम टिव्ही

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी घुसखोर यांचे अनाधिकृतपणे वास्तव थाटत असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पुणे पोलीस असतील किंवा लष्कर दलाच्या गुप्तचर विभागाकडून अनेक कारवाई सुद्धा करण्यात आल्या होत्या. असं असतानाच पुन्हा एकदा पुणे शहरात बेकायदेशीरपणे वास्तव करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये चार बांगलादेशी बेकायदेशीरपणे पुणे शहरात वास्तव करत होते. असं निदर्शनास आल्यानंतर त्यांना आता अटक करण्यात आली आहे.

स्वप्न मोंडल, मिथुन कुमार सांतल, रणधीर मोंडल आणि दिलीप मोंडल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चारी जणांकडे तपास केला असता हे सगळेजण मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशच्या सातखीरा या राज्यातून आलेले हे चारहीजण गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात मजूर म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Pune Four Bangladeshis Arrested
झिपलाईनवरुन पुढे पुढे आली, नागपूरची त्रिशा मनालीत ३० फूट खाली कोसळली; थरकाप उडवणारा VIDEO

दक्षिण कमांडच्या मिलिट्री इंटेलिजन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी दक्षिण कमांडच्या गुप्तचर विभागाला काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे पुण्यातील कोंढवा भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुप्तचर विभाग आणि कोंढवा पोलिसांनी तपास केला असता हे चारही जण कोंढवा येथील एका मजूर अड्ड्यावर वास्तव्यास आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्या चौघांनी सुद्धा तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे सर्वजण बांगलादेशचे असल्याचे निष्पन्न झालं आहे. या चारही जणांची आता कसून चौकशी सुरू असून हे नेमके कुठल्या मार्गाने भारतात आले होते आणि कशासाठी आले होते याचा सुद्धा तपास सुरू आहे.

Pune Four Bangladeshis Arrested
Eknath Shinde : शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com