झिपलाईनवरुन पुढे पुढे आली, नागपूरची त्रिशा मनालीत ३० फूट खाली कोसळली; थरकाप उडवणारा VIDEO

Nagpur Girl Dropped from Zipline : पर्यटनस्थळी साहसिक खेळांमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यास काय घडतं हे नागपूरच्या एका मुलीसोबत मनालीत घडलं आहे. अनेकदा पुरेशी सुरक्षा नसतानाही पर्यटकांकडून अतिउत्साहाच्या भरात जीवघेणा टास्क केला जातो.
Nagpur Girl Dropped from Zipline
Nagpur Girl Dropped from Zipline Saam Tv News
Published On

नागपूर : पर्यटन आणि तेथील सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अनेकदा पर्यटनस्थळी साहसी खेळ खेळतानाही प्रवाशांच्या जीवावर बेतलं जातं. पर्यटनस्थळी साहसिक खेळांमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यास काय घडतं हे नागपूरच्या एका मुलीसोबत मनालीत घडलं आहे. अनेकदा पुरेशी सुरक्षा नसतानाही पर्यटकांकडून अतिउत्साहाच्या भरात जीवघेणा टास्क केला जातो. एका नागपूरकन्याच्या बाबतीतही असंच घडलं असून मनालीत नागपूरची मुलगी त्रिशा बिजवे हिच्यासोबत अपघात घडला. झिप लाइनरवर असताना बेल्ट तुटल्याने त्रिशा ३० फूट खाली पडली. या अपघातामध्ये तिच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. आता, तिच्या कुटुंबाने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, येथील पर्यटनस्थळी पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नागपूरचे रहिवासी प्रफुल्ल बिजवे हे उन्हाळी सुट्टीसाठी पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत मनाली येथे पर्यटनासाठी गेले होते. रविवार ८ जून रोजी त्रिशा झिप लाइनरवर असताना, ती ज्या बेल्टने झीप लायनरवर लटकली होती अचानक तो बेल्ट तुटल्याने अपघात झाला. या अपघातात त्रिशा ३० फूट उंचीवरून खाली पडली. या दुर्घटनेत त्रिशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. सुदैवाने झीपलाईन ही जास्त उंचीची नसल्यानं आणि त्रिशा उतरत्या स्पॉटजवळ आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, त्रिशाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यानं तिच्या कुटुंबीयांनी झिपलाईनर व्यवस्थेवर संताप व्यक्त केला आहे.

Nagpur Girl Dropped from Zipline
Aditya Thackeray : राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? आदित्य ठाकरेंचं रोखठोक उत्तर, म्हणाले...

दरम्यान, या दुर्घटनेबाबत बोलताना त्रिशाच्या कुटुंबाने म्हटलं की, 'तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. आमच्या कुटुंबाला तिथे कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे, त्रिशावर सुरुवातीला मनाली, नंतर चंदीगडमध्ये उपचार करण्यात आले. सध्या त्रिशावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेतून प्रत्येकानं धडा घ्यायला हवा. पर्यटनस्थळी साहसी खेळांसाठी मैदानात उतरताना पुरेशी व्यवस्था आहे का हे तपासायला हवं. तसेच, तेथील सुरक्षा व्यवस्था आणि धोके लक्षात घेऊनच साहसी खेळ खेळावे. अन्यथा काहीवेळा हे साहस जीवावर बेतण्याची शक्यता असते.'

Nagpur Girl Dropped from Zipline
Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं! मुंबईसह राज्यात दमदार पावसाची एन्ट्री, कोणत्या जिल्ह्यांना झोडपलं? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com