Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं! मुंबईसह राज्यात दमदार पावसाची एन्ट्री, कोणत्या जिल्ह्यांना झोडपलं? VIDEO

Maharashtra Rain News : मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक भागांना पावसाने झोडपलं आहे.
Maharashtra Rain
Maharashtra Rain News Saam tv
Published On

मुंबई : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे काहींच्या घरात पाणी शिरलं आहे. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मुंबईसहित कल्याण, बदलापूरमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.

कल्याणमध्ये मुसळधार

मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. कल्याणमध्ये सायंकाळी साडे सहाच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने घरी परतणाऱ्या आणि खरेदीसाठी घर बाहेर निघालेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कल्याणमधील छत्रपती शिवाजी चौक परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी नागरिकांची तारांबळ उडाली. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी केली. केडीएमसीच्या नालेसफाईची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे.

Maharashtra Rain
Pune Crime : पुण्यातील पोलिस निरीक्षकाचा कारनामा उघड; कोट्यवधीची जमीन बळकावली, काय आहे प्रकरण? वाचा

रत्नागिरीत पावसामुळे वाहतुकीत बदल

रत्नागिरीच्या खेड दापोली मुख्य मार्गावरील पर्यायी मार्गावर पाणी साचल्याने मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. खेड-दापोली मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. यामुळे खेडमधील दस्तुरी फाट्यावरून वळसा मारून करावा लागणार आहे. तर दापोलीमधील कुडावळ येथे रहदारीसाठी बांधलेली मोरी पाण्यात वाहून गेली आहे.

उल्हासनगर अंबरनाथमध्ये पावसाची रिमझिम

उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात सकाळपासून प्रचंड उकाडा होता. मात्र संध्याकाळच्या सुमारास पावसाने आता हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे वातावरणात गारावर निर्माण झाला आहे, दरम्यान कुठेही पाणी भरल्याची घटना समोर आलेली नाही.

Maharashtra Rain
Shocking : पावसामुळे झाडाखाली आडोशाला थांबले अन् तिथेच घात झाला; वीज पडून ४ जणांचा मृत्यू , छत्रपती संभाजीनगरात हळहळ

गुहागरमध्ये दरडीचा भाग कोसळला

रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील पालशेत या भागात आज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे सावरपाटी भागात पाणी भरलं आहे. पावसामुळे ७-८ घरात पाणी शिरले आहे. तर पालशेत येथील आगडीमंदिर येथील योगेश जाक्कर यांच्या घरात मागच्या बाजूस दरडीचा भाग कोसळ्याने माती घरात आली आहे. तर पाच माड भागात सुद्धा काही घरात पाणी शिरले आहे. प्रशासन सध्या झालेल्या नुकसानाचा पंचनामा करत असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra Rain
Mumbai Road Accident : मुंबईच्या गोवंडीत भीषण अपघात; डंपरच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com