
नागपूरमध्ये भरचौकात तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. नागपूरच्या सावरनेर तालुक्यात ही घटना घडली. सिनेस्टाईल पाठलाग करत तरुणावर देसी कट्ट्याने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली. तरुणाच्या हत्येनंतर आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर झाला. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापा येथे ही हत्याकांडाची भयंकर घटना घडली. भरदिवसा सिनेटाईल पाठलाग करून देसी कट्ट्याने गोळ्या झाडून एका तरुणाची हत्या करण्यात आली. जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. चेतन गगाटे असं मृत तरुणाचे नाव आहे. तर अर्जुन निळे असं आरोपीचे नाव आहे. जुन्या वादातून चेतनची हत्या करण्यात आली.
चेतन आणि त्याच्या भावाने मिळून काही महिन्यांपूर्वी अर्जुनवर चाकूने हल्ला करत हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याचाच राग अर्जुनच्या मनात होता. याचाच बदला घेण्याचे त्याने ठरवले होते. रविवारी बाजार चौकात अर्जुनला चेतन दिसला. त्याने देसी कट्टा घेऊन चेतनचा पाठलाग केला. अर्जुन पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच चेतन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळू लागला.
अर्जुनने सिनेस्टाईल पाठलाग करत चेतनवर देसी कट्ट्याच्या सहाय्याने गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये चेतन गंभीर जखमी झाला. ही गोळीबाराची घटना भरचौकात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चेतनला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. चेतनची प्रकृती चिंताजनक होती. त्याचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला. चेतनची हत्या केल्यानंतर अर्जुनने स्वताच पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसपर्ण केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.