Shocking : पहाटे घरात घुसले, कुऱ्हाडीने गळा कापला, छाती अन् गुप्तांगांवर वार; तांत्रिकाची हत्या

Crime News : एका तांत्रिकाची घरात घुसून हत्या झाली. आरोपींनी कुऱ्हाडीने गळ्यावर वार करत तांत्रिकाची हत्या केली. घरात आरडाओरड झाल्याने तांत्रिकाची पत्नी घटनास्थळी पोहोचली. तेव्हा हा प्रकार समोर आला.
Crime News
Crime Newsx
Published On

उत्तरप्रदेशाच्या मुरादाबादमध्ये हरियाणा गावात एका तांत्रिकाची घरात घुसून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी कुऱ्हाडीने वार करुन तांत्रिकाला संपवल्याचे म्हटले जात आहे. तांत्रिकाच्या छातीवर, पायांवर आणि गुप्तांगांवर हल्लेखोरांनी चाकूने वार केले. आरडाओरड ऐकून तांत्रिकाची पत्नी घटनास्थळी पोहोचली पण तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. जादूटोण्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे.

हत्येबाबत माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तांत्रिकाच्या पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुरादाबादच्या कुंडार्की पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हरियाणा गावात घडली आहे. हल्ल्यात जीव गमावणाऱ्या तांत्रिकाचे नाव गुलाब सिंग सैनी (वय ६०) असे होते. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१५ जून) पहाटे ३ च्या सुमारास आरोपी तांत्रिकाच्या घरात घुसले. आरोपींनी गुलाब सिंगचा गळा कुऱ्हाडीने कापला.

Crime News
Air India Expressच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड, टेकऑफ होण्याआधी उड्डाण रोखलं; प्रवाशांमध्ये मोठी खळबळ

तांत्रिकाच्या मुलीने पोलिसांना या प्रकरणाबाबत माहिती दिली. 'शेजारच्या गावात राहणाऱ्या संजीवची बहीण आजारी होती. संजीवच्या कुटुंबियांनी त्याच्या बहिणीला माझ्या वडिलांकड भूतविद्या काढण्यासाठी आणले. माझ्या वडिलांनी शक्य तितके भूतविद्या काढली, पण ते मुलीला वाचवू शकले नाहीत. माझ्या वडिलांनी जादूटोणा करत मुलीला जाणूनबाजून मारले आहे, असे त्या मुलीच्या कुटुंबियांना वाटले', असे तांत्रिकाची मुलगी म्हणाली.

Crime News
Kantara 2 चित्रपटामागे शुक्लकाष्ठ! दोन महिन्यात तिघांचा मृत्यू, आता शूटिंगदरम्यान मोठा अपघात

तांत्रिकाच्या पुतण्यानेही या गोष्टीला दुजोरा दिला. 'जेव्हा माझा काका त्या मुलीला वाचवू शकला नाही, तेव्हा ते लोक माझ्या काकाला मारण्यासाठी आले होते. आम्ही त्यांना (तांत्रिक) वाचवले होते. किती दिवस त्याला वाचवणार, एक ना एक दिवस आम्ही त्याचा जीव घेऊ अशी धमकी संजीवच्या कुटुंबियांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी पहाटे घरात घुसून माझ्या काकाची हत्या केली', असे तांत्रिक गुलाब सिंग सैनीचा पुतण्या रामफल यांनी म्हटले.

Crime News
Rajeshwari Kharat : मी लहानपणापासूनच ख्रिश्चन, कोणता धर्म बदलला नाही; धर्मांतराच्या चर्चांवर 'फँड्री' फेम शालूची रोखठोक प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com