MIM corporator Azhar Sheikh was seriously injured after a deadly late-night attack in Chandrapur, 
क्राईम

Crime News: एमआयएमच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; चंद्रपूर हादरलं!

AIMIM Corporator Beaten: चंद्रपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील AIMIM चे नगरसेवक अझहर शेख यांच्यावर १५ ते १६ जणांनी कथितरीत्या हल्ला केला. जखमी नगरसेवकावर सध्या उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Bharat Jadhav

  • चंद्रपूरमध्ये एमआयएमचे नगरसेवक अझहर शेख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

  • हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • १५ ते १६ जणांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एमआयएमच्या नगरसेवकावर १५ ते १६ जणांनी जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात नगरसेवक गंभीर जखमी झालेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अझहर शेख असं एमआयएमच्या नगरसेवकाचं नाव आहे. ते चंद्रपूर महानगरपालिकेतील एकमेव एमआयएमचे नगरसेवक आहेत. त्य शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यावर हल्ला झाला.

नेमकं प्रकरण काय ?

चंद्रपूर महानगरपालिकेतील एमआयएमचे नगरसेवक अजहर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. शनिवारी रात्री उशिरा शेख हे आपल्या बिर्याणी हॉटेलसमोर उभे होते. त्यावेळी तेथे १५ ते १६ काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना जबर मारहाण केली, असा आरोप शेख यांनी केला. यातून अजहर शेख यांनी आपला कसाबसा जीव वाचवला.

शेख यांचं चंद्रपूर शहरातील मुख्य भागात जटपुरा गेट येथे बिर्याणी हॉटेल आहे. हल्ल्याची घटना तेथील एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतलं आहे. अजहर शेख नगरसेवक असलेल्या रहमतनगर भागात एमआयएम आणि काँग्रेस पक्षातील वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अजहर शेख हे रहमतनगर भागातून नगरसेवक असून याच भागातील काँग्रेस नगरसेविका सोफिया तवंगर यांचे नातेवाईक आणि सोहेल रजा यांनी मारहाण केल्याचा अझहर शेख यांचा आरोप आहे. आपल्या चांगल्या कामाची धास्ती विरोधकांना असल्यानं आपल्यावर हल्ला झाल्याचं शेख यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Fort : पनवेलजवळील 'हा' किल्ला एकदा नक्की पाहा, सह्याद्रीत लपलाय १८व्या शतकातील भव्य इतिहास

Maharashtra News Live Update: शहापूरमध्ये ढगफुटीचा तडाखा; धबधब्यावर आलेले पाच पर्यटक पुरात वाहून गेले, एकाचा मृत्यू

Gurupournima 2026 : गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? काय आहे महत्त्व?

CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एंट्री; 100% पेट्रोलसाठी सोशल मीडियावर मोहीम

Water Intake: दिवसभर पाणी पिता पण, पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का? ९०% लोक करतात ही मोठी चूक

SCROLL FOR NEXT