Buldhana News  Saam Tv
क्राईम

Buldhana Crime: विवाहितेवर सामूहिक बलात्कार, विळ्याचा धाक दाखवत नवऱ्यासमोरच भयंकर कृत्य; बुलडाणा हादरले

Buldhana Police: बुलडाण्यामध्ये मध्यरात्री घरात घुसून विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. विळा आणि चाकूचा धाक दाखवत दोन आरोपींनी हे भयंकर कृत्य केले.

Priya More
  • बुलडाण्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार

  • घरात घुसून २ आरोपींनी महिलेसोबत केलं भयंकर कृत्य

  • २ आरोपींविरोधात गुन्हा दाखल

  • फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मध्यरात्री दोन जण घरात घुसले. आरोपींनी विळ्याचा धाक दाखवत पीडितेवर तिच्या नवऱ्यासमोरच आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले. या घटनेमुळे बुलडाणा हादरले. या प्रकरणी २ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. धारदार शस्त्रांचा धाक दाखवून १९ वर्षीय विवाहितेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच विशेष पथके नियुक्त केली आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून आरोपींनी हे भयंकर कृत्य केले.

पीडित महिला आणि तिचा नवरा एका शेतात कामसाठी वास्तव्यास असून तेथे मजुरीचे काम करतात. रात्री दोघेही घरात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी दरवाजा तोडून घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यापैकी एकाच्या हातात चाकू, तर दुसऱ्याच्या हातात विळा होता. शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी मोबाइल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपींनी नवरा-बायकोला घराबाहेर शेतात ओढत नेले. तेथे महिलेच्या नवऱ्याला रोखून धरत दोघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

घटनेनंतर आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला. पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पाच विशेष पथके तयार केली असून घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकाने पाहणी केली आहे . पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध तांत्रिक आणि स्थानिक स्तरावरील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT