Bengluru Ex DGP Om Prakash Killed Case Saam Tv
क्राईम

Crime: उकळतं तेल फेकलं, डोळ्यात मिरची पूड टाकली, सपासप वार करत माजी DGP ला संपवलं; बायकोच्या क्रूरतेने सर्वांना हादरवलं

Bengluru Ex DGP Om Prakash Killed Case: बंगळुरूचे माजी पोलिस महासंचालक यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या बायकोनेच हालहाल करून त्यांचा जीव घेतला असल्याचे तपासातून उघड झाले.

Priya More

कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी)ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची बायको पल्लवीला अटक केली आहे. या हत्याकांड प्रकरणाच्या तपासातून हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. माजी डीजीपी ओम प्रकाश यांचे बायकोसोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. या वादातूनच बायकोने त्यांची निर्घृण हत्या केली असल्याचे तपासातून उघड झाले आहे.

माजी पोलिस महासंचालक ओम प्रकाश यांचा रविवारी बंगळुरू येथील राहत्या घरी रहस्यमय स्थितीत मृतदेह आढळून आला होता. शरीरावर धारधार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची बायको पल्लवी आणि मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. या चौकशीतून त्यांची हत्या बायकोनेच केली असल्याचे उघड झाले आहे. ओम प्रकाश यांच्या बायकोने त्यांना हालहाल करून मारलं.

ओम प्रकाश घरी आल्यानंतर बायकोने त्यांच्या अंगावर उकळतं तेल फेकलं. त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर त्यांना दोरीच्या सहाय्याने बांधून अंगावर चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. ६८ वर्षीय निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यावर काचेच्या बाटलीने आणि चाकूच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका नातेवाईकाला दिलेल्या प्रॉपर्टीवरून ओम प्रकाश आणि पल्लवी यांच्यात वाद सुरू होता. नेहमी याच गोष्टीवरून त्यांच्यामध्ये वाद व्हायचे. याच भांडणाने हिंसक वळण घेतले आणि बायकोने माजी डीसीपी नवऱ्याची हत्या केली.

पोलिस चौकशीदरम्यान ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवीने पोलिसांना सांगितले की, गेल्या एका आठवड्यापासून घरात भांडणे सुरू होती आणि ते तिला आणि तिच्या मुलीला गोळ्या घालण्याची वारंवार धमकी देत होते. २० एप्रिलपासून अनेक गोष्टींवरून आमच्यात वाद सुरू होता आणि दुपारपर्यंत तो वाढला. प्रकाश यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. पण कसाबसा मी माझा जीव वाचवला.' त्यानंतर संतापलेल्या पल्लवी यांनी उकळलेले तेल प्रकाश यांच्या अंगावर ओतले आणि डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर तिने त्यांचे हात बांधले आणि काचेच्या बाटलीने त्यानंतर चाकूने त्यांच्या अंगावर सपासप वार केले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

नवऱ्याची हत्या केल्यानंतर पल्लवीने दुसऱ्या आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीला फोन करून नवऱ्याच्या हत्येची माहिती दिली. त्या महिलेने स्वतः पोलिसांना माजी डीसीपींच्या हत्येची माहिती दिली. त्यानंतर पोलिस तात्काळ माजी डीजीपींच्या घरी पोहोचले. तिथे त्यांनी लगेच पल्लवी आणि तिच्या मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आई आणि मुलीची सुमारे १२ तास चौकशी केली. या चौकशीतून माजी डीसीपींच्या हत्येची ही धक्कादायक माहिती उघड झाली. माजी डीजीपी ओम प्रकाश यांच्या पोटावर आणि छातीवर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT