Pune : बाणेरमध्ये ₹३००० लाच घेतली, तीन पोलीस निलंबित, पुण्यात खळबळ

Pune police bribe case : बाणेर पोलीस स्टेशनमधील तिघांवर ३००० रुपयांची लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने तातडीने निलंबन करण्यात आले. डीसीपी निखील पिंगळे यांनी ही कारवाई केली असून, शहरात पोलीस भ्रष्टाचारावर चिंता व्यक्त होत आहे.
Pune police bribe case Latest News
Pune police bribe case Latest News
Published On

Pune police bribe case Latest News : पुणे पोलिसात खळबळ माजवणारी बातमी समोर आले आहे. बाणेर पोलीस स्टेशनमधील ३ पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेतल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. तीन हजार रूपयांची लाच घेतल्याच्या आरोपांमुळे त्यांच्यावर तडकाफडकी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त गुन्हे निखील पिंगळे यांनी या बाबतचे आदेश दिले आहेत. पोलिस अंमलदार संतोष जगु शिंदे, प्रतिक महेश त्रिंबके, दिनेश संतोष इंगळे अशी त्यांची नावे आहेत. कॉप्स २४ चे बीट मार्शल म्हणून हे तिघे काम करत होते.

शिंदे, त्रिंबके आणि इंगळे हे तिघेही पोलीस बाणेर परिसरात बीट मार्शल म्हणून कर्तव्यावर होते. पाषाण येथील शिवालय सोसायटीमध्ये पार्किंगच्या फ्लोरिंगचे काम सुरू होते. तिथे त्यांनी पाच हजार रूपयांची लाच मागितली आणि तीन हजार रूपये घेतल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर तडकाफडकी तिघांचे निलंबन करण्यात आले. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

Pune police bribe case Latest News
Bhide bridge Closed : पुणेकरांनो लक्ष द्या! भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

रात्री साडे अकरा वाजता बीट मार्शल पार्किंगच्या फ्लोरिंगचे काम सुरू होते तेथे गेले. "का काम सुरु केले आहे. बंद करुन टाका, तुमच्या विरुद्ध डायल ११२ वर तक्रार आली आहे. "तुम्ही आमच्या सोबत पोलीस स्टेशनला चला" असे म्हणाले. त्या दोन्ही पोलिसांपैकी एकाने तुम्ही एक काम करा, आम्हाला थोडे पैसे द्या, तुमचे काम १५ ते २० मिनिटात पूर्ण होईल, परत कोणाची तक्रार आली तर आम्ही अर्ध्या तासाने येतो, अर्ध्या तासाने आम्ही आल्यानंतर काम सुरू नाही पाहीजे" असे म्हणाला.

Pune police bribe case Latest News
Mumbai-Pune Highway Accident : बोर घाटात भीषण अपघात, ट्रकची ५ वाहनांना धडक, माय-लेकीचा मृत्यू, १२ जखमी

सोसायटीच्या चेअरमनने पोलिसांना किती पैसे द्यायचे याबाबत विचारले. त्यावेळी तिघांनी संगनमत करुन पाच हजार रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोडीनंतर ३००० रुपये स्विकारले. याबाबत उपायुक्तांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत शिंदे, त्रिंबके आणि इंगळे या तिघांनाही निलंबित केले. दरम्यान, चार दिवसांपूर्वी याच पोलीस स्टेशन मधील एका शिपायाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीत बसून फोटो काढला होता, त्याच्यावरही कारवाई करण्यात आलेली नाही. याच्यावर कारवाई कधी होईल असा प्रश्न होता उपस्थित होतो.

Pune police bribe case Latest News
Pune News : तिघांनी काठी-दगडाने मारले, भररस्त्यात तरूणाची क्रूर हत्या, पुण्यातलं आंबेगाव हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com