Bhide bridge Closed : पुणेकरांनो लक्ष द्या! भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Bhide pool alternate routes : भिडे पूल मेट्रोच्या कामासाठी आजपासून दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांचे.
Bhide bridge closed Pune
Bhide bridge closed Pune
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Bhide bridge closed Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून शहरातील ऐतिहासिक भिडे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मेट्रोच्या कामासाठी आणि देखभालीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भिडे पूल बंद करण्यात आला आहे. या काळात वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. भिडे पूल बंद केल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

आजपासून भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या डेक्कन स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामानिमित्त बाबा भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी दीड महिना बंद राहणार आहे. या काळातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या बंदमुळे डेक्कन जिमखाना, नारायण पेठ आणि कर्वे रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.

Bhide bridge closed Pune
Mumbai-Pune Highway Accident : बोर घाटात भीषण अपघात, ट्रकची ५ वाहनांना धडक, माय-लेकीचा मृत्यू, १२ जखमी

पर्यायी मार्ग काय?

भिडे पुलामार्गे डेक्कन जिमखानाकडे येणाऱ्या वाहनांनी टिळक चौक खंडोजीबाबा चौका मार्गे इच्छित स्थळी जावे. काकासाहेब गाडगीळ पुलामार्गे वाहन चालकांनी डेक्कन जिमखानाकडे जावे. नारायण पेठेतील केळकर रस्ता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलामार्गे वाहन चालकांनी डेक्कन जिमखानाकडे जावे.

Bhide bridge closed Pune
Pune News : तिघांनी काठी-दगडाने मारले, भररस्त्यात तरूणाची क्रूर हत्या, पुण्यातलं आंबेगाव हादरले

नदीपात्रातील रस्त्याने महेंद्र गॅरेज चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी टिळक चौक खंडोजी बाबा चौक मार्गे कोथरूडकडे जावे. पूना हॉस्पिटल परिसरातील फुल केवळ दुचाकी वाहनांसाठी खुला आहे. डेक्कन पीएमपी स्थानकातून नारायण पेठेकडे जाणाऱ्या वाहनांनी टिळक चौकामार्गे जावे असे आवहान वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी केले आहे.

झेड-ब्रिज (Z-Bridge): डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि शिवाजीनगर परिसरातून पेठ भागात जाण्यासाठी उपयुक्त.

लकडी पूल (Sambhaji Bridge): कर्वे रस्ता, तिलक रस्ता आणि लक्ष्मी रस्ता जोडणारा हा पूल मध्यवर्ती भागासाठी पर्याय आहे.

बाल गंधर्व पूल (Bal Gandharva Bridge): शनिवार पेठ, नारायण पेठ आणि लक्ष्मी रस्त्यावरील रहिवाशांसाठी हा पूल सोयीचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com