Crime News Saam Tv
क्राईम

Crime: बॉयफ्रेंडला भेटायला गेलेल्या तरुणीवर गँगरेप, जबरदस्ती प्रायव्हेट व्हिडीओ बनवले अन्...

Bihar Crime: बिहारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बॉयफ्रेंडला भेटायला गेली असता आरोपींनी दोघांना पकडलं. शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचा व्हिडीओ बनवला.

Priya More
  • बिहारच्या मोतिहारीमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

  • चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप

  • आरोपींनी प्रायव्हेट व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची दिली धमकी

  • पोलिसांनी चार आरोपींना अटक करून तपास सुरू केला

बिहारमध्ये एका तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात ही घटना घडली. पीडित तरुणी तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या चार तरुणांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे बिहार हादरला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गु्न्हा दाखल करत त्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती. त्यावेळी ते बसले होते त्याठिकाणी चार आरोपी आले. त्यांनी तरुणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला जबरदस्ती शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. यावेळी आरोपींनी व्हिडीओ तयार केले. हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी पीडित तरुणीने घरी गेल्यावर आपल्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीतून इतर २ आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर त्यांनी छापा टाकत तिघांनाही बेड्या ठोकल्या. त्यानंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस सध्या पुरावे गोळा करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाऊन पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल. पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. सध्या पोलिस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भात उष्णतेचा कहर, अनेक जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला

Kundan Mangalsutra: लग्नसराईत शोभून दिसेल कुंदन मंगळसूत्र; पाहा या ७ ट्रेंडी लेटेस्ट मंगळसूत्र डिझाईन्स

Wednesday Horoscope: कामाच्या ठिकाणी सावध राहा, ५ राशींना कुटुंबाचा पाठिंबा मिळणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Raigad : रायगडच्या किनाऱ्यावरील भक्कम सागरी किल्ला, 'येथील' ऐतिहासिक वैभव पाहताच डोळे दिपतील

माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोलिसांत FIR; काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT