Manasvi Choudhary
आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदललेली जीवनशैली आणि प्रदूषणामुळे केसगळती होण्याची समस्या दिवसेदिवस वाढत चालली आहे.
यावर उपाय म्हणून अनेकजण बाजारातील केमिकयुक्त तेलांचा वापर करतात मात्र यामुळे केसांचा पोत खराब होतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला नैसर्गिक आणि आयुर्वेदिक घटकांनी बनलेले हर्बल हेअर ऑइल सांगणार आहोत.
आयुर्वेदात भृंगराज तेल केसांसाठी फायदेशीर आहे. हे तेल केसांच्या मुळांना मजबूत करते आणि केसगळती देखील कमी करते. कोमट करून हे तेल तुम्ही केसांना लावू शकता.
कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असते. जे केसांच्या मुळांना पोषण देते तसेच केसांना तुटण्यापासून वाचवते. आठवड्यातून २ वेळा कांद्याच्या तेलाने केसांची मालिश करा.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. याचे तेल करून तुम्ही केसांना लावल्यास डोके शांत राहते व डोक्याचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
खोबरेल तेलामध्ये कडुनिब, जास्वंद आणि जवसाचे दाणे एकत्र करून तेल बनवा. हे तेल केसांची मुळे घट्ट करतात. आठवड्यातून दोनदा या तेलाने मालिश करा.
केसात कोंडा असल्याने केसगळती होत असेल तर कडुनिंब आणि जास्वंदीच्या फुलांचे तेल तुम्ही केसांना लावा हे तेल टाळू स्वच्छ करून केस गळती रोखते.