सकाळी नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही? ५ मिनिटांत रव्यापासून बनवा या ५ झटपट आणि सोप्या रेसिपी

Manasvi Choudhary

सकाळचा नाश्ता

सकाळच्या धावपळीत ऑफिसचा डबा, मुलांच्या शाळेची तयारी अशावेळी नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही.

Rava Breakfast Recipe | Google

सोप्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्याला रोजच काय बनवावे असा प्रश्न महिलांना पडतो. सकाळी झटपट तुम्हाला रव्यापासून बनवता येतील अशा सोप्या रेसिपी या वेबस्टोरीतून सांगणार आहोत.

Rava Breakfast Recipe | saam tv

रवा ढोकळा

एका भांड्यामध्ये रवा आणि दही एकत्र करून १० मिनिटे बाजूला ठेवा नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि इनो घालून चांगले फेटून घ्या. नंतर एका प्लेटमध्ये तेल लावा आणि त्यात मिश्रण ओतून १० ते १२ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. त्यानंतर मोहरी-कढीपत्त्याची खमंग फोडणी द्या.

Instant Rava Dhokla

कुरकुरीत रवा डोसा

एका भांड्यामध्ये रवा, तांदळाचे पीठ, मीठ आणि पाणी मिक्स करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण आंबवण्यासाठी काही वेळ ठेवा. नंतर गॅसवर गरम पॅनमध्ये मिश्रण पसरवून डोसा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

Crispy Rava Dosa

मऊ रवा इडली

एका भांड्यामध्ये दही मिक्स करा नंतर त्यात रवा भिजवून मीठ आणि इनो टाका. इडलीच्या भांड्याला तेल लावून मिश्रणओता आणि १० ते १५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या.

Instant Rava Idli

रवा उपमा

रवा उपमा बनवण्यासाठी कढईमध्ये रवा चांगला भाजून घ्या. नंतर रवा एका प्लेटमध्ये काढून त्याच कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, शेंगदाणे, कांदा आणि मिरची परतून घ्या. त्यात दीड ते दोन वाटी पाणी उकळवून घ्या. पाणी उकळल्यावर भाजलेला रवा हलक्या हाताने हळूहळू ओता, जेणेकरून गाठी होणार नाहीत. झाकण ठेवून वाफेवर उपमा शिजवून घ्या.

Rava Upma

गोड रवा शिरा

गॅसवर कढईत गरम तूपामध्ये त काजू-मनुके चांगले परतून घ्या नंतर त्यात रवा भाजून घ्या. या मिश्रणात उकळलेले गरम पाणी मिक्स करा. रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत हे पाहा. रवा शिजल्यावर साखर आणि वेलची पूड मिक्स करा. साखर विरघळली की वरून साजूक तूप सोडून गरमागरम शिरा तयार करा.

Rava Sheera

Next: फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे 'मिक्स व्हेज सूप'; घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा हॉटेल स्टाइल सूप

Mixed Vegetable Soup Recipe
येथे क्लिक करा...