फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे 'मिक्स व्हेज सूप'; घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा हॉटेल स्टाइल सूप

Manasvi Choudhary

पौष्टिक पदार्थ

पावसाळ्यात शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते यासाठी तुम्ही गरमा गरम सूप देखील पिऊ शकता. बाजारातील पॅकेटबंद सूप पिण्यापेक्षा ताज्या भाज्यांचे सूप तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.

Mixed Vegetable Soup Recipe

मिक्स व्हेजिटेबल सूप

मिक्स व्हेजिटेबल सूप शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे सूप बनवू शकता.

Mixed Vegetable Soup Recipe

साहित्य

मिक्स व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी गाजर, कोबी, मटार, लसूण, आलं, बटर, तूप, काळी मिरी पावडर, कॉर्नफ्लॉअर, मीठ, पाणी हे साहित्य घ्या.

Mixed Vegetable Soup Recipe

लसूण परतून घ्या

सूप बनवण्यासाठी सर्वातआधी गॅसवर कढईत बटर किंवा तूप गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण आणि आलं चांगलं परतून घ्या.

Garlic | pinterest

भाज्या मिक्स करा

नंतर त्यात गाजर, कोबी, बीन्स आणि मटार या भाज्या चांगल्या परतून घ्या.

Mixed Vegetable Soup Recipe | pinterest

मसाले मिक्स करा

मिश्रणात पाणी मिक्स करून त्यात चवीनुसार मीठ व काळी मिरी पावडर मिक्स करा. गॅसवर मध्यम आचेवर सूपला चांगली उकळी येऊ द्या म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजतील.

Spices | yandex

कॉर्नफ्लोअर मिक्स करा

सूप तुम्हाला घट्ट हवे असल्यास एका छोट्या वाटीत पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून ती सूपमध्ये मिक्स करा.

Cornflower | yandex

मिश्रण उकळून घ्या

मिश्रणाला चांगली उकळी आली की गरमा गरम सूप घरच्या घरी तयार होईल.

Mixed Vegetable Soup Recipe

NEXT: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी 5 मिनिटांत बनवा कुरमुरा भेळ

Kurmura Bhel Recipe
येथे क्लिक करा...