Manasvi Choudhary
संध्याकाळी तुम्हाला काही चटपटीत खायचं असेल तर तुम्ही कुरमुऱ्याची भेळ ही रेसिपी करू शकता. कुरमुऱ्यांची भेळ घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
घरगुती साहित्यापासून तुम्ही ही भेळ घरीच बनवू शकता. यासाठी तुम्हाला कुरमुरे, फराळी चिवडा, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आंबट- गोड चटणी, हिरवी चटणी, कोथिंबीर हे साहित्य घ्या.
सर्वाताधी गॅसवर कुरमुरे हलके भाजून घ्या.
एका मोठ्या बाऊलमध्ये कुरमुरे आणि फराळी चिवडा एकत्र मिक्स करा.
मिश्रणात बारीक कापलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची मिक्स करा. हे सर्व साहित्य एकत्र करा.
नंतर या मिश्रणात तिखट हिरवी चटणी आणि आंबट-गोड चिंचेची चटणी मिक्स करा.
भेळ तयार झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. अशाप्रकारे घरच्या घरी कुरमुऱ्याची भेळ तयार होईल.