Honor killing crime case Saam Tv
क्राईम

Crime News: पत्नीने चहा बनवला नाही म्हणून नवऱ्याची आत्महत्या, बिहारमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Bihar Crime News: पत्नीने आपल्या सांगण्यावरून चहा बनवून दिला नाही, त्यामुळे एका व्यक्तीने घरात गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करत पत्नीचा जबाब नोंदवलाय.

Bharat Jadhav

चहा अनेकांना आवडणारं पेय. चहामुळे नाती जुडत असतात. पण याच चहामुळे एका व्यक्तीला आत्महत्या करावी लागलीय. ही धक्कादायक घटना बिहारच्या मुझफ्फपूर जिल्ह्यातील कोल्हुआ पैगंबरपूर गावात घडलीय. बायकोने चहा बनवली नाही म्हणून राग अनावर झालेल्या नवऱ्यानं आत्महत्या केलीय.

ही घटना मुझफ्फपूर जिल्ह्यातील कोल्हुआ पैंगबरपूर गावात घडलीय. सोनू कुमार (वय ३५) असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती आहियापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला त्यानंतर अंतिम संस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांना सोपवलाय.

या आत्महत्येच्या घटनेबाबत पत्नी बुलबुल कुमारी हिने पोलिसांना जबाब दिलाय. पत्नी बुलबुल हिने दिलेल्या जबाबानुसार अहियापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनास्थळाचा तपास एफएसएलकडून करण्यात आला.

चहाला नकार दिला म्हणून...

पत्नीने आपल्या जबाबात सांगितले की, शुक्रवारी सकाळी पती सोनू कुमारने तिला चहा बनवण्यास सांगितले. पण आपण झोपेतून उठू शकलो नाही आणि झोपून राहिले. त्यानंतर नवऱ्याने आपल्याला चहा बनवायला सांगितलं आहे, हे विसरले. झोप झाल्यानंतर मांस आणायला गेली.

पण पत्नीने आपलं ऐकलं नाही, म्हणून अपमान झाला असं पती सोनू कुमारला वाटलं त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली. पत्नी जेव्हा बाजारातून मांस घेऊन घरी आली. तेव्हा घरातील दृश्य पाहून तिला मोठा धक्का बसला. तिच्या पायाखालची जमीन सरकरली. नवऱ्यानं घरात गळफास घेतली असल्याचं तिला दिसलं. हे दृश्य पाहताच तिने मोठ्याने आरडाओरडा केला.

तिचा आवाज ऐकून शेजारी राहणारे लोकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. स्थानिकांनी लटकलेल्या अवस्थेत असलेल्या सोनूला खाली उतरवलं आणि रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा त्यांनी सोनूला मृत घोषित केलं.

दोनदा आत्महत्येचा प्रयत्न

बुलबुलने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा सोनूने याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. छोट्या-छोट्या कारणावरून त्याने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र लोक वेळेवर पोहोचल्याने त्याचा जीव वाचला होता. सोनू कुमारची मानसिक स्थिती ठीक नव्हती, असंही बुलबुलने पोलिसांना सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT