Family Killed son Saam Tv
क्राईम

Bihar News: भावाच्या मृ्त्यूनंतर विधवा वहिनीसोबत लग्न केलं; कुटुंबीयांनी दिली भयंकर शिक्षा

Family Killed son Marrying widow sister in law vaishali : बिहारमध्ये वहिनीसोबत लग्न करणाऱ्या दिराची हत्या झाल्याची घटना घडलीय. बिहार पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : भावाचा मृत्यू झाल्यामुळे दिराने विधवा वहिनीसोबत लग्न केलं. त्यामुळे कुटुंबीयांनी मुलालाच संपवल्याची घटना बिहारमधून समोर आलीय. भावाचा मृत्यू आणि विधवा वहिनीशी लग्न करणं खूप महागात पडलंय. याची किंमत त्याला जीव देऊन चुकवावी लागली. ही घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यात घडलीय. विशेष म्हणजे तरूणाच्या कुटुंबातील सदस्यांनीच त्याला संपवलं, अशा चर्चा परिसरात सुरू आहेत.

या व्यक्तीची निर्घृपणे हत्या करून मृतदेह बागेत फेकून देण्यात आला होता. मृतदेहाची माहिती तरुणाच्या कुटुंबीयांना मिळताच ते सर्वजण तात्काळ मुलीच्या घरी गेले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय, असं मृताच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तर, सासरच्या लोकांनी त्याचा खून करून मृतदेह बागेत फेकल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांवर (Bihar Crime News) केलाय.

कुटुंबीयांनी दिली भयंकर शिक्षा

घटनेनंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी मृतदेह चादरीत गुंडाळून घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या बागेत फेकून दिला होता. वैशाली जिल्ह्यातील बेलसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साइन गावात ही घटना (Family Killed son) घडलीय. मृत रामकुमार महतो हा सायन गावचा रहिवासी होता. रामचं लग्न मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कुधनी येथील किशुनपूर मोहनी गावातील मुलीशी झालं होतं.

राजकिशोर सिंह यांनी ८ वर्षांपूर्वी त्यांची मुलगी नीतूचं लग्न रामसोबत लावून दिलं होतं. मृताचे मेहुणे विकास कुमार यांनी टीव्ही नाईन हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षांपूर्वी मृताच्या भावाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर नीतू (sister in law) सासरी दोन वर्ष राहिली होती. त्यानंतर रामने त्याच्या विधवा वहिनीसोबत लग्न केलं होतं. पण राम आणि नीतूच्या लग्नाला त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा नव्हता, या लग्नामुळे ते नाराज होते.

कुटुंबीयांनी दिली भयंकर शिक्षा

रामचे कुटुंब त्यांना दोघांन सतत त्रास देत होतं, त्यांनी अनेकदा या जोडप्याला मारहाण देखील केली होती. कुटुंबीयांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून रामने बायकोला तिच्या माहेरच्या राहायला पाठवलं. स्वतः मजूरी करण्यासाठी नेपाळला निघून गेला होता. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी राम त्याच्या घरी आला होता. तेव्हा त्याच्यात आणि कुटुंबीयांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण झालं (Crime News) होतं.

रामचा खून झालाय, असा आरोप त्याच्या सासरच्या लोकांनी केलाय. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. तर राम त्याच्या बायकोच्या माहेरी राहत होता, असं मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलंय. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिलीय. याबाबत पोलीस ठाण्याचे प्रमुख पंकज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या की आत्महत्या? याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT