Nagpur Nandanvan Colony News Saam Tv
क्राईम

Crime: धारदार शस्त्रानं आधी पोट फाडलं, नंतर गुप्तांग कापून झाडाला लटकवलं; महिलेने बॉयफ्रेंडला दिला भयानक मृत्यू

Bihar Crime: बिहारमध्ये एका महिलेने नवरा, भाऊ आणि वडिलांच्या मदतीने बॉयफ्रेंडची हत्या केली. तरुणावर चाकूने वार करत त्याचे पोट फाडण्यात आले. त्यानंतर त्याचे गुप्तांग कापून झाडाला लटकवण्यात आले होते.

Priya More

Summary -

  • बिहारच्या रोहतास जिल्ह्यात महिलेने बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या केली

  • महिलेने नवरा, वडील आणि भावाच्या मदतीने केली हत्या

  • पावणे तीन वर्षांनंतर कोर्टाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली

बिहारमध्ये एका महिलेने बॉयफ्रेंडला भयंकर मृत्यू दिला. या महिलेने नवरा, भाऊ आणि वडिलांच्या मदतीने बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या केली. चाकूने वार करत आधी तरुणाचे पोट फाडले. नंतर गुप्तांग कापून झाडाला लटकवले. पावणे तीन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. या प्रकरणी कोर्टाने चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसंच, सर्व आरोपींना प्रत्येक ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील आहे. अगरेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भगवानपूर गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली होती. सुमन देवी नावाच्या महिलेचे गावातील मन्नू नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या महिलेने नवरा, भाऊ आणि वडिलांच्या मदतीने मन्नूची हत्या केली होती. महिलेने ४ मार्च २०१९ ला मन्नूला फोन करून बोलावून घेतले होते. तो देखील कुटुंबातील कुणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोहरीच्या शेतामध्ये मन्नूचा मृतदेह आढळून आला होता.

मन्नूचे पोट चाकूने फाडण्यात आले होते. तर त्याचे गुप्तांग कापून झाडाला लटकवण्यात आले होते. हत्येच्या काही दिवस आधी आरोपींनी मन्नूला ओलीस देखील ठेवले होते. या संदर्भात पंचायत देखील झाली होती. या पंचायतीनंतरही महिला मन्नूला भेटत राहिली. घटनेच्या दोन दिवस आधी सुमन देवी तिच्या नवऱ्यासोबत माहेरी गेली होती. त्यानंतर तिने नवरा, भाऊ आणि वडिलांच्या मदतीने मन्नूचा काटा काढत त्याची हत्या केली.

या प्ररणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपी सुमन देवी, तिचा नवरा प्रभाकर सिंग, तिचे वडील दुधेश्वर चौधरी, भाऊ फूलचंद यांना अटक केली. हत्या करण्यात आलेल्या मन्नूच्या वडिलांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती सर्व आरोपी तुरूंगात होते. या प्रकरणात पावणे तीन वर्षांनंतर मन्नूच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला. कोर्टाने या प्रकरणात चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT