Shocking: खोलीत बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर जबरदस्ती गर्भपात; प्रसिद्ध कथावाचकाचा भयंकर चेहरा समोर
Bihar CrimeSaam Tv

Shocking: खोलीत बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर जबरदस्ती गर्भपात; प्रसिद्ध कथावाचकाचा भयंकर चेहरा समोर

Bihar Crime: बिहारमध्ये कथाकाराला पोलिसांनी अटक केली. या कथाकाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्ती तिचा गर्भपात केला. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.
Published on

Summary -

  • बिहारच्या दरभंगामध्ये धक्कादायक घटना उघडकीस

  • प्रसिद्ध कथावाचकावर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप

  • लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर लैंगिक अत्याचार

  • गर्भवती झाल्यानंतर जबरदस्ती गर्भपात

  • आरोपी कथाकाराविरोधात गुन्हा दाखल करत अटक

बिहारच्या दरभंगा येथील कथाकार श्रवण दासजी महाराजला पोलिसांनी अटक केली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. हा कथाकार पीडित मुलीवर गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करत होता. त्यानंतर पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने जबरदस्ती तिचा गर्भपात केला. कथाकार श्रवण दासजी महाराजविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरभंगा येथे कथाकार श्रवण दास जी महाराज हे प्रसिद्ध नाव आहे. श्रवण दासजी महाराजने अल्पवयीन मुलीचे वर्षभर लैंगिक शोषण केले नंतर लग्न करण्यास नकार दिला. पीडित मुलगी गर्भवती राहित्यानंतर त्याने जबरदस्ती तिचा गर्भपात केला. पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी श्रवण दासजी महाराजविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या.

Shocking: खोलीत बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर जबरदस्ती गर्भपात; प्रसिद्ध कथावाचकाचा भयंकर चेहरा समोर
Crime: राक्षस व्हायचा माझा बाप..., दारूच्या नशेत पोटच्या १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, आरोपी कथाकार श्रवण दासजी महाराज अल्पवयीन मुलीला त्याच्या खोलीत आल्यावर तिचे कपडे काढायला सांगत असे त्यानंतर तो तिच्यासोबत भयंकर कृत्य करायचा. त्याने पीडितेचा गर्भपात केला. तसंच तिला शांत करण्यासाठी त्याने एका बंद खोलीमध्ये लग्न देखील केले. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कथाकार श्रवण दासजी महाराजने तो खोटा असल्याचे सांगितले आणि लग्न केलं नसल्याचे सांगितले.

Shocking: खोलीत बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर जबरदस्ती गर्भपात; प्रसिद्ध कथावाचकाचा भयंकर चेहरा समोर
Crime: भाजप नेत्याकडून बायकोची हत्या, अनैतिक संबंधाचा संशय; किचनमध्येच चाकूने सपासप वार

आरोपी कथाकाराने व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलीला सोबत ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिस सध्या त्याची चौकशी करत आहेत. व्हायरल व्हिडीओ आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. या हाय-प्रोफाइल प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कथाकाराला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केली.

Shocking: खोलीत बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर जबरदस्ती गर्भपात; प्रसिद्ध कथावाचकाचा भयंकर चेहरा समोर
Nashik Crime : नाशिक हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवले, दमदाटी केली; ५५ वर्षीय शिक्षकाची ९ वर्षीय मुलीवर वाईट नजर पडली अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com