Bihar Crime News Saam Tv
क्राईम

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावाने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

Bihar Crime News: बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. चुलत भावाने ३ मित्रांसह पीडितेसोबत भयंकर कृत्य केले. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Priya More

Summary:

  • बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

  • चुलत भावाने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

  • पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला

  • चारही आरोपींना अटक करण्यात आली

बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. चुलत भावाने आपल्या ३ मित्रांसह या मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. रविवारी रात्री गया जिल्ह्यातल्या आम्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे बिहार हादरले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री गावातील उत्सवादरम्यान अल्पवयीन मुलगी बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती. तिचा बॉयफ्रेंड गुरुआ भागात राहतो. दोघे ज्या ठिकाणी भेटले त्या ठिकाणी पीडितेचा चुलत भाऊ त्याच्या तीन मित्रांसोबत आला. आरोपींनी आधी पीडितेच्या बॉयफ्रेंडला निर्दयपणे मारहाण केली आणि नंतर त्याच्यासमोरच अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुलगी लघुशंकेसाठी घरातून बाहेर गेली असताना दबा धरून बसलेल्या आरोपींनी तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले. पीडिता रात्री उशिरा घरी परतल्यावर तिने आपल्या आजीला संपूर्ण प्रकार सांगितला. सोमवारी सकाळी कुटुंबीयांनी आम्स पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच गावातील सनोज, अनुज, शिशुपाल आणि साजन या चारही तरुणांना अटक केली.

साजन हा पीडितेचा चुलत भाऊ असल्याचे सांगितले जात आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक जण तीन मुलांचा बाप देखील आहे. घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेला पीडितेचा बॉयफ्रेंड सध्या फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे स्थानिक संतप्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा; सामन्याच्या मानधनात तब्बल 50 टक्के कपात, अचानक नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हिंगोलीत ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी की अयशस्वी? उद्या ठाकरेसेना घेणार मोठा निर्णय

PM Modi- Donald Trump: PM मोदींसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांचं ठोस आश्वासन; म्हणाले, भारतावर हल्ला झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत...

Operation Manjar: ऑपरेशन टायगरनंतर महाराष्ट्रात सुरू होणार 'ऑपरेशन मांजर', एकनाथ शिंदेवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT