

रांचीमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार
पिझ्झामध्ये गुंगीचे औषध मिसळल्याचा आरोप
आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
झारखंडमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ती वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेली होती. या महिला डॉक्टरला पिझ्झामध्ये गुंगीचे औषध मिसळून खायला देण्यात आलं होतं. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. रांचीच्या लालपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दानिशविरोधात गुन्हा दाखल करत त्याला पश्चिम बंगालमधून अटक केली.
पीडित डॉक्टर मूळची जमशेदपूरची असून ती रांचीमध्ये एमडीएस पदवीच्या अभ्यासाची तयारी करत आहे. ही घटना ९ एप्रिल रोजी घडली. तिच्या एका मैत्रिणीने तिला लालपूर येथील तिच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केले होते. ही महिला डॉक्टर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तिच्या मैत्रिणीच्या घरी पोहचली.
या पार्टीसाठी तीन मुलं आणि दोन मुली असे एकूण ५ जण आधीच त्याठिकाणी उपस्थित होते. रात्री ८ वाजता केक कापण्यात आला. त्यानंतर डॉक्टरला भूक लागली होती तेव्हा पार्टीत आलेल्या दानिशने तिच्यासाठी पिझ्झा आणला. हा पिझ्झा खाल्ल्यानंतर पीडित डॉक्टरला चक्कर आल्यासारखे वाटत होते. तब्येत बरी नसल्यामुळे ती एका खोलीमध्ये आराम करण्यासाठी गेली. त्याचवेळी आरोपी दानिश तिच्या खोलीत गेला आणि ती बेशुद्ध असल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पीडित डॉक्टरला जाग आली तेव्हा तिने आपल्या मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला वसतिगृहात सोडले. पण तिची मानसिक आणि शारीरिक स्थिती खालावत गेली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरने याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी दानिश फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. त्याला पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.