BIHAR JEHANABAD MURDER: BROTHER-IN-LAW ALLEGEDLY KILLS SISTER-IN-LAW AFTER FAMILY DISPUTE Saam Tv
क्राईम

Shocking : भयंकर! जेवण उशिरा वाढलं म्हणून संतापला, धारदार शस्त्राने दिराने वहिनीला संपवलं

Bihar Crime News : बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यात जेवण वाढण्यास उशीर झाल्याच्या वादातून दिराने वाहिनीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यात कौटुंबिक वादातून महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना

  • जेवण वाढण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून दिराने वाहिनीवर हल्ला केला

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली

  • प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

कुटुंबात होणारे वाद लगेच मिटणारे असावेत कारण हे वाद टोकाला गेले तर भयंकर घडू शकतं. असाच एक धक्कादायक प्रकार बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील इमादपूर गावात घडला आहे. वाहिनीने वेळेवर जेवायला न दिल्याच्या रागातून दिराने तिचा काटा काढला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव अंशु देवी असे आहे. घटनेच्या दिवशी त्या घरात एकट्याच होत्या. कुटुंबीय शेतात भात पेरणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, अंशू देवीचा दीर कुणाल कुमार काहीवेळाने घरी आला आणि लवकर जेवण वाढण्याचा आग्रह करू लागला. मात्र इतर कामांमध्ये व्यस्त असलेल्या अंशू देवीला जेवण वाढायला काहीसा उशीर झाला. यावरून कुणाल भडकला आणि दोघांमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला गेला आणि कुणाल कुमारने धारदार शस्त्राने अंशु देवी यांच्या मानेवर वार करत त्यांची जागीच हत्या केली.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही त्याने संतापाच्या भरात महिलेचे शीर धडापासून वेगळे केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी आरोपी कुणाल कुमारला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले असून हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्रही जप्त केले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आरोपीला व्यसन होते आणि तो अनेकदा आक्रमक व्हायचा. या हत्याकांडामुळे महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून आरोपीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

रोज कोथिंबिरचं पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

आजच WhatsApp मधील या 10 महत्त्वाच्या सेटिंग्स बदला, स्कॅमर्सचा प्रत्येक डाव ठरेल फोल

Maharashtra Politics: माजी खासदारांना शिवीगाळ, भाजप नेत्याचा तडकाफडकी पदाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Plastic Currency : तुमच्या खिशातील कागदी नोटा बंद होणार? आरबीआय आणतेय प्लॅस्टिकच्या नोटा; जुन्या नोटांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT