High Blood Pressure : सतत डोकं दुखतंय? असू शकतो हाय बीपीचा धोका, 'ही' ३ लक्षणं वेळीच ओळखा, नाहीतर...

Shreya Maskar

हाय ब्लड प्रेशर

तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्हाला तीव्र डोकेदुखी उद्भवू शकते. उच्च रक्तदाबामुळे होणारी डोकेदुखी अनेकदा डोक्याच्या मागच्या भागात सुरू होते आणि सकाळी अधिक तीव्र असू शकते.

High Blood Pressure | pinterest

डोकेदुखी

या प्रकारची डोकेदुखी ठणकल्यासारखी वाटू शकते, जी रक्तदाब वाढल्याने वाढते. उच्च रक्तदाबामुळे अनेकदा चक्कर येऊ शकते किंवा दृष्टी अंधुक होऊ शकते.

headache | pinterest

श्वास घेण्यास त्रास

जर डोकेदुखीसोबत छातीत दाब जाणवत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हे उच्च रक्तदाबाचे एक गंभीर लक्षण असू शकते.

Difficulty breathing | pinterest

मळमळ

काही वेळा उच्च रक्तदाबामुळे नाकातून रक्त येऊ शकते किंवा मळमळ होऊ शकते. ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब रक्तदाब तपासा.

nausea | pinterest

रक्तदाब तपासा

रक्तदाबाची नियमित तपासणी करून घ्या. विशेषतः जर तुमचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या कुटुंबात उच्च रक्तदाबाचा इतिहास असेल.

Check blood pressure | pinterest

वजन नियंत्रित ठेवा

लठ्ठपणा हे उच्च रक्तदाबाचे एक प्रमुख कारण आहे. वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करा. अतिरिक्त मीठामुळे रक्तदाब वाढतो. चालणे, योग, सायकलिंग किंवा पोहणे यांसारखा दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Keep weight under control | pinterest

तणाव कमी

वाढलेल्या रक्तदाबाचे तणाव हे एक कारण आहे. दररोज थोडा वेळ ध्यान, दीर्घ श्वासोच्छ्वास व्यायाम किंवा तुमच्या आवडत्या छंदासाठी काढा. सिगारेट आणि मद्यपानामुळे रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यांचे सेवन टाळा.

Less stress | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : हाय BP कसा कंट्रोल कराल? लाइफस्टाइमध्ये करा 'हा' छोटा बदल, वारंवार डॉक्टरांचीही गरज भासणार नाही

High Blood Pressure | AI PHOTO
येथे क्लिक करा...