Shreya Maskar
ब्लड प्रेशर म्हणजे रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर पडणारा दबाव. जेव्हा हा दाब सामान्यपेक्षा जास्त होतो तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात.
तुमच्या आहारातून मीठाचे प्रमाण कमी करा. लोणचे, पापड, पॅकेट स्नॅक्स, खारट पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ यांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते.
हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे यांमध्ये पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तुम्ही पालक, भोपळा, टोमॅटो, केळी, संत्रे, काकडी, बीट आणि पेरू यांचे सेवन करा.
जर तुमचे वजन जास्त असेल, तर थोडे वजन कमी केल्याने देखील तुमच्या रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
दररोज किमान ३० मिनिटे शारीरिक हालचाल केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तुम्ही जलद चालणे, सायकलिंग, पोहणे, योगा आणि हलके स्ट्रेचिंग करू शकता.
शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे (डिहायड्रेशनमुळे) अनेकदा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. शरीराच्या सामान्य कार्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि रक्त शुद्ध देखील होते.
सततच्या तणावाचा रक्तदाबावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे ध्यान करा, दीर्घ श्वास घ्या, पुरेशी झोप घ्या, छंद जोपासा आणि मनसोक्त फिरा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.