crime news. x
क्राईम

Shocking : प्लीज खा ना...वहिनीला आईस्क्रीम देणं दीराला भोवलं, भावाच्या डोक्यात सनक अन् जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले

Crime News : नव्या नवरीला तिच्या धाकट्या दीराने आईस्क्रीम खाण्याचा आग्रह केला. या गोष्टीचा त्याच्या थोरल्या भावाला राग आला. रागाच्या भरात थोरल्या भावाने धाकट्या भावाचा खून केला.

Yash Shirke

Crime : लग्नाचा आनंद साजरा करत असताना एका छोट्या कृतीने एका कुटुंबाचे आयुष्य कायमचे बदलून गेले आहे. बिहारच्या छपरा येथील परसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माडर गावात हृदयविदारक घटना समोर आली आहे. नवविवाहित वहिनीला प्रेमाने आईस्क्रीम देणाऱ्या १७ वर्षीय छोट्या दिराचा त्याच्या सख्ख्या मोठ्या भावाने खून केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

१० जून रोजी माडर गावातील शनी कुमार याचे लग्न झाले. वहिनी घरी आल्यानंतर रविवारी (१५ जून) त्याचा धाकटा भाऊ सोनू कुमार (वय १७ वर्ष) आईस्क्रीम घेऊन घरी आला. स्वत:साठी एक, आईसाठी एक आणि मोठ्या भावासाठी एक आईस्क्रीम सोनूने आणली. शनी कुमारने आईस्क्रीम खाण्यास नकार दिला. तेव्हा ती आईस्क्रीम वहिनीला दे असे त्यांच्या आईने सोनूला सुचवले.

सोनूने अगदी प्रेमाने वहिनीला आईस्क्रीम दिली आणि 'प्लीज खा ना' असे सोनू त्याच्या वहिनीला म्हणाला. यावरुन शनी कुमार संतापला. सोनूवर चिडत त्याने वाद घातला. काही क्षणातच या गोष्टीने हिंसक वळण घेतले. संतापाच्या भरात शनीने चाकू उचलला आणि सोनूवर सलग सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोनूला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. एकत्र साजरा आनंद साजरा करण्याासठी जमलेले लोक हत्येच्या घटनेमुळे घाबरुन गेले. सोनूच्या आईवडिलांना आणि भावंडांना या घटनेचा जबरदस्त धक्का बसला आहे. आरोपी शनी कुमार सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत अशी माहिती परसा पोलीस ठाण्याचे अधिकारी सुनील कुमार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसीच्या रुग्णालयात गोंधळ, रुग्णाला उपचार न मिळाल्याने संतप्त नातेवाईकांचा संताप

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

रायगडनंतर नंदुरबारमध्येही महायुतीत राडा; शिवसेना-भाजपात तेढ,भाजप आमदाराला सेनेशी युती आवडेना

SCROLL FOR NEXT