Bhandara Crime  Saam Tv
क्राईम

Bhandara Crime: घरासमोरून अपहरण, घरी नेलं अन् पँट काढली; तेवढ्यात..., ११ वर्षांच्या मुलीसोबत भयंकर घडलं

Bhandara Police: भंडाऱ्यामध्ये ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिस करत आहेत.

Priya More

शुभम देशमुख, भंडारा

भंडाऱ्यातील तुमसर शहरामध्ये ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली. घरासमोर खेळणाऱ्या मुलीचे अपहरण करून आरोपी तिला घरी घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. १६ मे रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर आरोपी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना धमकी देत होते त्यामुळे त्यांनी तक्रार देणं टाळलं. पण आरोपीच्या धमक्या वाढल्यानंतर पालकांनी आज तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

तूमसरमध्ये ११ वर्षांच्या मुलीवर १६ मे रोजी लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणी तब्बल दोन आठवड्यांनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी समाजाची भीती आणि आरोपींकडून येणाऱ्या धमक्यांमुळे तक्रार करण्याचे टाळले. मात्र आरोपीने थेट पीडितेच्या घरी जाऊन तिच्या पालकांना धमकी दिली. या प्रकारानंतर भयभीत झालेल्या कुटुंबियांनी अखेर धैर्य एकवटत तुमसर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. त्याठिकाणी आरोपी आला आणि त्याने तिचे तोंड दाबून जबरदस्तीने उचलून स्वत:च्या घरी नेले. आरोपीने स्वत:ची पँट काढली तेवढ्यात पीडित मुलीच्या भावाने आवाज दिला. पीडित मुलगी ओरडल्यामुळे आरोपीची पोलखोल झाली. त्याने लगच मागच्या दारातून पळ काढला. या घटनेनंतर आरोपीने पीडित मुलीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता. तसंच त्यांना वारंवार शिवीगाळ करत होता. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करत असून लवकरच आरोपीला अटक होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT