Panvel Crime News: मुलगा होत नसल्यानं सासरचा छळ, महिलेची मुलीसह आत्महत्या? माहेरच्यांकडून हत्येचा आरोप

Panvel Crime Woman Killed Herself : पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. मुलगा होत नसल्यानं विवाहितेचा सासरी छळ होत होता. त्यातून तिला माहेरून पैसे आणण्यास दबाव टाकला जात होता.
Crime News
Crime Newsx
Published On

विकास मिरगणे, साम प्रतिनिधी

हुंड्यासाठी सासरवास झाल्यानं वैष्णवी हगवणे हिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच पनवेलमध्ये एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. एका विवाहितेनं आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना पनवेल तालुक्यातील पेठाली गावात घडलीय.

सोनम अभिषेक केणी (वय ३०) असं विवाहितेचं नाव आहे. तर मुलीचे नाव देवांशी असे आहे. परंतु ही आत्महत्या नसून तिच्या सासरच्यांनी तिचा खून केलाय, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांनी केलाय. दरम्यान या घटनेनंतर सासरचे फरार झाले आहेत. पोलिसांना एक सुसाईट नोट मिळाली असून त्यातून सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.

Crime News
Nilesh Chavan Arrest: पिंपरी-चिंचवडनंतर व्हाया कोकण; दिल्लीवरून रोडने प्रवास करत गाठली सोनौली बॉर्डर, निलेश असा झाला फरार

सोनमने गळफास लावून जीवन संपवले, तर मुलीचा मृतदेहही घरातच आढळला. ही आत्महत्या नसून सासरच्यांनी छळ करून खून केल्याचा आरोप सोनमच्या माहेरच्यांनी केलाय. सुरुवातीला पोलिसांनी मुलीचा अपघाती मृत्यू आणि सोनमने नैराश्यातून आत्महत्या केल्याची नोंद केली होती. मात्र सोनमच्या वडिलांनी १ मे रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नापासून मुलगा नसल्याने व माहेरून पैसे आणण्यासाठी सोनमचा सासरच्यांकडून सतत मानसिक छळ होत होता.

Crime News
Nilesh Chavan Arrest: मोबाईल, ATMचा वापर कटाक्षानं टाळला; मागोवा घेणं कठीण, पोलिसांना निलेश चव्हाण कसा गावला?

या आधारे पोलिसांनी पती अभिषेक केणी, सासू प्रभावती केणी आणि चार नणंदांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. सोनमने मुलीचा खून केला की दोघींचाही मृत्यू अन्य कारणाने झाला, याचा तपास पोलीस करत असून सोनमची सुसाईड नोट व वैद्यकीय अहवालातून सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

घटनेला महिना उलटूनही मुख्य आरोपी अभिषेक आणि त्याची आई प्रभावती फरार असल्याने सोनमच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तळोजा पोलिसांकडून सोमनच्या चारही नणंदांची चौकशी सुरू असून, फरार आरोपींच्या शोधासाठी तीन विशेष पथके तयार केली आहेत. सोनमला आणि तिच्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी ईच्या तिच्या माहेरच्यांनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com