Crime  x
क्राईम

Crime : बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर अन्... फसवून घरी नेत विद्यार्थिनीवर लैंगिक छळ, प्राध्यापकाला अटक

Crime News : १९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. जेवणाच्या बहाण्याने घरी बोलवून अत्याचार केल्याचे आरोप पीडितेने केले आहेत.

Yash Shirke

  • घरी बोलावून प्राध्यापकाने डाव साधला

  • १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक छळ

  • आरोपी प्राध्यापक पोलिसांच्या ताब्यात

Shocking : १९ वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका खासगी विद्यापीठातील ४५ वर्षीय प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. प्राध्यापकाने फसवून घरी बोलावून अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. तिच्या तक्रारीवरुन प्राध्यापकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना बंगळुरूमध्ये घडली आहे.

पीडित तरुणी ही बीसीएच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. तिने टिळकनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 'त्याने (प्राध्यापकाने) २५ सप्टेंबर रोजी पीडितेला घरी जेवण्यासाठी आमंत्रित केले. माझी पत्नी आणि मुले घरी असतील असा दावा त्याने केला. बाकीचे लोक असल्याने त्याचा प्रस्ताव मान्य केला. त्याने माझ्या आईशीही बोलून तिला माझ्यासोबत येण्यास सांगितले. त्याची पत्नी आणि मुले घरीच आहेत असे समजून माझ्या आईने मला त्याच्यासोबत जाण्यास सांगितले', असे पीडितेने पोलिसांना सांगितले.

'घराजवळ गेल्यावर स्कूटर पार्क करताना घरी कोणीही नाहीये असे त्याने मला सांगितले. मी तेव्हा संकोच केला, मी त्याच्यासोबत सुरक्षित आहे असे त्याने मला आश्वासन दिले. त्याच्या घरातील सोफ्यावर मी जाऊन बसले. तो माझ्या शेजारी येऊन बसला. मला वैयक्तिक प्रश्न विचारु लागला. त्याने मला माझ्या बॉयफ्रेंडशी संबंध तोडण्यास सांगितले', अशी माहिती पीडितेने दिली.

पीडित विद्यार्थिनी म्हणाली, 'त्याने मला त्याच्या घराच्या शेजारी असलेल्या पीजीमध्ये राहायला सांगितले, जेणेकरून मी शंका विचारण्यासाठी त्याच्या घरी नियमितपणे जाऊ शकेन. परीक्षेतील गुण, पैसे अशा अनेक बाबींमध्ये मदत करेन असे त्याने मला सांगितले. त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यादरम्यान माझ्या मित्राचा फोन आला. मी सरांच्या घरी आहे, असे माझ्या मित्राला फोनवर सांगितले. तेव्हा मी तुझी परीक्षा घेत होतो असे त्याने मला सांगितले. शेवटी ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस असेही म्हटले. या प्रकरणी पोलिसांनी प्राध्यापकाला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT