Accused husband arrested after brutally stabbing his home guard wife in front of their children in Bengaluru. saam tv
क्राईम

वाद मिटवण्याच्या बहाण्यानं घरात घुसला, दोन पोरांसमोरच घेतला होमगार्ड बायकोचा जीव

Husband Kills Wife Due To Online Betting Addiction In Bengaluru: बंगळुरूतील महादेवपुरा परिसरात पतीने वाद मिटवण्याच्या बहाण्याने पत्नीचा चाकूने वार करून खून केला.

Omkar Sonawane

बंगळूरुतील महादेवपुरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली असुम एका होमगार्ड महिलेचा तिच्याच पतीने निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव मंजुळा (वय32) असे असून त्या महादेवपुरा पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या, आरोपी पतीचे नाव प्रदीप असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप याला ऑनलाइन बेटिगचे व्यसन लागले होते. या व्यसनामुळे त्याचे आर्थिक तसेच कौटुंबिक आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झाले होते, पत्नीशी सतत वाद होत असल्याने मंजुळा या काही वर्षांपासून माहेरी राहत होत्या.

कौटुंबिक सदस्यांच्या म्हणण्यांनुसार, प्रदीप पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून मंजुळाने त्याच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता. रविवारी संध्याकाळी प्रदीप हा सासरी गेला आणि वाद मिटवण्याच्या बहाण्याने मंजुळाकडे माफी मागू लागला. त्याने पुन्हा एकत्र राहण्याची विनंती केली. मात्र त्याने आधीच जॅकेटमध्ये चाकू लपवून ठेवला होता. हे सगळे बोलत असताना प्रदीपने तिला जवळ ओढले आणि तिच्यावर चाकूने सपासप वार केले. हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लहान मुलांसामोर आणि कुटुंबियांसमोर घडला. या प्रकरणामुळे सगळेच हादरले.

घटनेनंतर आरोपीने स्वतःदेखील जखमी झाला आणि घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेत मंजुळाला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याठिकाणी तिला मृत घोषित केले. महादेवपुरा पोलीसांनी हत्या प्रकरण दाखल करून आरोपीचा शोध घेतला आणि काही वेळातच त्याला अटक केली. दरम्यान, या घटनेपूर्वी प्रदीपने एक सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.

त्यात त्याने ऑनलाईन गेमिंगमुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले. तसेच पत्नीने परत येण्यास नकार दिल्यास तिची हत्या करणार असल्याचेही त्याने म्हटले होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीपने ऑनलाईन बेटिंगमध्ये तब्बल 7 ते 8 लाख रुपये गमावले होते. या व्यसनामुळेच त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT