Sakshi Sunil Jadhav
प्रत्येक माणसाला पैसा कमावून त्यांचे घरखर्च, इच्छा पूर्ण करायच्या असतात. पण सध्या कार्पोरेटमध्ये जास्त पॅकेजची नोकरी मिळणं कठीण झालंय. हाच विचार एका महिलेने केला.
केरळमधील एका महिलेने आयटी मॅनेजरची नोकरी सोडून रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आणि आज ती महिन्याला महिन्याला जवळपास 60 हजार रुपये कमावत आनंदाने आयुष्य जगतेय.
संबंधित महिला तब्बल 9 वर्षे आयटी मॅनेजर म्हणून कार्यरत होती. सतत कामाचा ताण, दबाव आणि धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे तिने हा निर्णय घेतला.
आयटी क्षेत्र सोडल्यानंतर तिने स्वतःची रिक्षा चालवण्याचा वेगळा मार्ग निवडला. ज्यात पैसाही जास्त आहे.
बऱ्याचदा काही लोक म्हणतात, पुरुषच रिक्षा चालवतात पण तिने आत्मविश्वासाने स्वत:ची ओळख निर्माण केली.
रिक्षा चालवून महिला सध्या महिन्याला सुमारे 60 हजार रुपये कमावते. असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जास्त पगाराची नोकरी सोडली असली तरी ती आता जास्त समाधानी आणि आनंदी असल्याचं तिने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
उद्योजिका डॉ. नेझरीन मिधलाज यांनी तिच्याशी झालेला संवाद इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अनेक सोशल मीडिया युजर्सनी तिच्या धाडसी निर्णयाचा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले.
मोठ्या पदापेक्षा मनाची शांती आणि आनंद महत्त्वाचा असल्याचा संदेश तिच्या प्रवासातून मिळतो.
NEXT: ATM चा व्यवहार ते एलपीजी, १ जूनपासून कोणकोणते बदल होणार?