'बिग बॉस २०' च्या या आठवड्यात ११ स्पर्धक नॉमिनेट
अरिशफा खानची १ लाईफलाईन काढली
'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने काझीला फटकारले.
सलमान खान होस्ट करत असलेला 'बिग बॉस २०' हा शो दिवसेंदिवस अधिकच रंजक होत जात आहे. पहिल्या दिवसापासूनच या शोने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या घरात नात्यांची समीकरणे प्रत्येक मिनिटाला बदलताना दिसतात. वाईल्ड कार्ड स्पर्धक नकुल ढुल आणि कुशल तन्वर(गुल्लू) यांच्यातील जोरदार वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर बिग बॉसने एक कठोर निर्णय घेतला आणि नकुलला घरातून बाहेर काढले.
बिग बॉसच्या घरातून आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणखी एका स्पर्धकाला बाहेर काढण्यात आले आहे. या 'वीकेंड का वार'मध्ये एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे. या आठवड्यात ११ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. काल घरातील सदस्यांनी किराणा सामानासाठी अरिशफा खानची एक लाईफलाईन काढून घेतली. यामुळे अरिशफा संतापली आणि ती घरातील सदस्यांशी भांडताना दिसली.
सोशल मीडियावर 'बिग बॉस २०'ची माहिती देणारे अनेक अकाउंट , पेज आहेत. त्यांच्या रिपोर्टनुसार, 'बिग बॉस २०'च्या घरातून या आठवड्यात अभिनेता अमन गांधी बाहेर पडणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सर्वात कमी मते मिळाल्यामुळे अमन गांधीला 'बिग बॉस २०' चे घर सोडावे लागले. अद्याप 'बिग बॉस २०' ने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. आज 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान याचा खुलासा करेल.
'बिग बॉस २०' च्या घरात १६ स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. रोहिद खान, ईशा रिखी, रिती तिवारी, नकुल ढुल हे सदस्य घराबाहेर पडले आहेत. या आठवड्यात आम्रपाली दुबे आणि मनीष गोयल वगळता सर्व घरातील सदस्यांना घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. मनीष नॉमिनेशनच्या शर्यतीतून बाहेर राहिला कारण तो नुकताच शोमध्ये सामील झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.