बीडमधील वातावरण सरपंच हत्या प्रकरणानंतर आता महादेव मुंडे हत्या प्रकरणाने तापलंय. महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडचाच हात असल्याचा आरोप महादेव मुंडे यांच्या पत्नीने केलाय. मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाहीये. दरम्यान या हत्याप्रकरणाबाबत वाल्मीक कराडच्या जुन्या सहकाऱ्याने धक्कादायक खुलासा केलाय. वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आय विटनेसचाही खून केलाय, असा धक्कादायक खुलासा विजयसिंह बांगर याने केलाय.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळी शहरात १५ महिन्यापूर्वी झालेल्या मुंडे हत्या प्रकरण चर्चेत आहे. व्यावसायिक महादेव मुंडे यांचा निर्घृणपणे खून झाला होता. परळी शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानावर त्यांची हत्या झाली होती. मात्र हा खून कोणी केला आणि कशासाठी केला त्याचा तपास पोलिसांकडून होऊ शकला नाहीये. या प्रकरणाची दखल आमदार सुरेश धस यांनी घेतलीय. त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची मागणी केल्यानंतर आता या तपासणीच्या कामाला वेग आलाय.
मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत काल महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरू आहेत. आज विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची रुग्णालयात भेट घेतली. यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आय विटनेसला वाल्मीक कराड आणि प्रशासनातील टोळीने संपवलं, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. वाल्मीक कराड जेलमध्ये गेल्यापासून 42 सराईत गुन्हेगारांना जामीन मिळालाय, ते सध्या बाहेर आहेत. त्यांना वाल्मीक कराड याने जामीन मिळवून दिलाय. वाल्मीक कराड हा बीड जिल्ह्यात जेलमधून अंडरवर्ल्ड चालवत आहे. मुंडे प्रकरणातील आरोपींना पकडणं हे पोलीस प्रशासनासमोरच चॅलेंज आहे. बीड पोलिसांनी यामध्ये तळागाळापर्यंत तपास करावा, अशीही मागणी विजयसिंह बांगर यांनी केलीय.
मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाहीये. परंतु पोलीस आमच्याकडून पुरावे मागत आहेत. ते काम त्यांचे आहे, त्यांनी आरोपी आणि पुरावे शोधले पाहिजे. बीड पोलिसांपुढील आव्हान आहे. हे आव्हान त्यांनी स्विकारून महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तळापर्यंत तपास केला जावा, असं विजयसिंब बांगर म्हणाले.
महादेव मुंडे हत्याकांड हे दुहेरी हत्याकांड आहे, कारण मुंडेंची हत्या झाली होती, त्यांच्या तीन महिन्यांनी या प्रकरणाचा आय विटनेसचीही खून कराडच्या टोळीने केलाय. मात्र कागदपत्रावर त्याच्या मृत्यूची नैसर्गिक मृत्यू ,अशी नोंद करण्यात आल्याचं विजयसिंह बांगर म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.