beed police arrest youth along with 10 bike worth rs 6 lakh 60 thousand
beed police arrest youth along with 10 bike worth rs 6 lakh 60 thousand  Saam Digital
क्राईम

Beed Crime : दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, बीडमध्ये युवकास अटक; 6 लाख 60 हजार रुपयांच्या 10 दुचाकी जप्त

विनोद जिरे

बीडसह धाराशिव, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात दुचाकी चोरत धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकी चोरांच्या रॅकेटचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केलाय. दुचाकी चोरी करुन त्याची कमी पैशात विक्री करणाऱ्या एकाला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या संशयित आराेपीच्या साथीदारांचा पाेलिस शाेध घेताहेत.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अविनाश ऊर्फ बालाजी दिनकर पायाळ हा युवक बीड शहरातील सोमेश्वर मंदिर परिसरात चाेरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळताच त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. ताे घटनास्थळी येताच त्याला पाेलिसांनी ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता त्याच्यावर दुचाकी चोरीचे गुन्हे यापूर्वी नोंद असल्याची माहिती समाेर आली. त्याने बीड, धाराशिव, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून 6 लाख 60 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: आजपासून या 5 राशींचे येणार अच्छे दिन, 7 दिवस प्रत्येक गोष्टीत मिळेल यश

IND Vs ZIM: रिंकू सिंहचा षटकार पाहून डोक्याला लावाल हात; मुझारबानीच्या चेंडूला पाठवलं थेट मैदानाबाहेर, Video

Who Is Mihir Shah: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा कोण आहे? BMW ने महिलेला उडवलं, अद्यापही आहे फरार

Gujarat Bus Accident: सापुतारा घाटात भीषण अपघात; 70 पर्यटकांना घेऊन जाणारी बस कोसळली दरीत

Special Report : पिळदार शरीरासाठीची औषधही घातक; मेफेंटरमाईन सल्फेट आणि स्टेरॉईडमुळे हृदयविकाराचा धोका

SCROLL FOR NEXT