Beed Crime News samm tv
क्राईम

Beed Crime: तू बाहेर ये तुला मारून टाकतो..., घरात घुसून शिवीगाळ अन् अमानुष मारहाण, वकिलाने महिलांनाही सोडलं नाही

Beed Police: बीडमध्ये भयंकर घटना घडली. माजलगावमध्ये एका वकिलाने घरात घुसून शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली. यावेळी महिलांना देखील अमानुष मारहाण केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये एका वकिलासह त्याच्या कुटुंबीयांनी गावातील एका शेतकऱ्याच्या घरात घुसून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. बीडच्या माजलगावात तालुक्यातील गोविंदपूर येथे ही घटना घडली. दगडू रामभाऊ आवळे यांच्या कुटुंबीयांना जुन्या राजकीय वादातून मारहाण करण्यात आली. या वादातूनच वकिलासह त्याच्या कुटुंबीयाने शेतकऱ्याच्या घरावर दगडफेक करत, लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. आरोपींनी महिलांना देखील सोडले नाही. सर्वांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या धक्कादायक घटनेमुळे माजलगावमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळाळेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील गोविंदपूर या गावामध्ये राहणारे दगडू आवळे या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना गावातील काही स्थानिक राजकीय व्यक्तींनी आपल्या मनातील जुन्या वादातून घरात घुसून महिलांसह अनेकांना मारहाण केली. आरोपींनी महिलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. या प्रकारामुळे पीडित कुटुंबांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माजलगाव पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पीडित महिलांनी थेट माजलगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी ६ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी पीडित महिलांचे जबाब नोंदवून संबंधितांविरोधात कलम 323, 504, 506, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू आवळे यांनी सांगितले की, 'वकील, त्याच्या बायकोसह ६ जण आमच्या घराबाहेर आले होते. त्यांनी माझ्या मुलाला राम्या तू आता बाहेर ये तुला जिवेच मारून टाकतो असे म्हणाले. मी तो घरी नसल्याचे सांगितले. तर त्यांनी घरात घुसून लाठ्याकाठ्या, गज आणि विटांच्या सहाय्याने आम्हाला मारहाण केली. आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केला. माझ्या बायको आणि सुनेला पाईपच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली.'

पीडित महिलांनी सांगितले की, 'आम्ही नेहमीप्रमाणे घरी होतो, तेव्हा अचानक काही लोक घरात घुसले आणि मारहाण सुरू केली. जातीवाचक अपशब्द वापरून आमचा अपमान केला गेला. आम्हाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.' मारहाणीत जखमी झालेल्या सर्वांवर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी तिला बीडला हलवण्यात आले. या हल्ल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. पोलिस या सर्व आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

SCROLL FOR NEXT