Pune Crime : 'बहिणींची काळजी वाटते, आई-वडिलांचा आदर'; पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाने संपवलं आयुष्य, बनवला हृदयद्रावक व्हिडिओ

Pune Youth Ends Life : देहूरोडमध्ये कंस्ट्रक्शन इमारतीवर कामावर असलेला संजयकुमार हा १७ तारखेपासून बेपत्ता होता. त्यामुळे, देहूरोड पोलीस स्टेशनला त्यासंदर्भात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
pimpri chinchwad  a young man ended his life
pimpri chinchwad a young man ended his lifeSaam Tv News
Published On

पुणे (पिंपरी-चिंचवड) : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका परप्रांतीय कामगार तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या तरुणाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ देखील बनवला होता. या व्हिडिओतून त्याने आपल्या कुटुंबाबद्दलची काळजी आणि आपल्या दोन बहिणींवरील प्रेमही व्यक्त केलं आहे. तरुणाने मृत्युपूर्वी आपल्या कुटुंबाला पाठवलेला व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय १८) हा पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी येथील देहूरोडमध्ये कन्स्ट्रक्शन इमारतीवर कामाला होता. मात्र, नैराश्यातून व आर्थिक चणचण असल्यानं त्यानं आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतं.

देहूरोडमध्ये कंस्ट्रक्शन इमारतीवर कामावर असलेला संजयकुमार हा १७ तारखेपासून बेपत्ता होता. त्यामुळे, देहूरोड पोलीस स्टेशनला त्यासंदर्भात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकानं तांत्रिक तंत्रज्ञानच्या आधारे त्याचा शोध लावला. मात्र, पोलिसांच्या हाती त्याचा मृतदेह लागला, या मृतदेहाशेजारी एक विषाची बाटली पोलिसांना सापडली आहे. त्यामुळे, संजयने विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करुन त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.

pimpri chinchwad  a young man ended his life
Pune News : फिरायला गेले, क्षुल्लक कारणावरुन मित्रालाच कारमध्ये संपवलं, मृतदेह लोणावळ्यात फेकला; मुळशीत धडकी भरवणारं हत्याकांड

संजयकुमारने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडितून तो आपल्या कुटुंबीयांचा उल्लेख करताना हृदयद्रावक हाक देत असल्याचं दिसून येतं. 'माझ्या आई वडिलांबद्दल मला आदर आहे, तर माझ्या दोन लहान बहिणींची मला खूप काळजी वाटते. माझ्यानंतर त्यांचा सांभाळ नीट करावा, त्यांनी शिकून मोठं व्हावे हीच माझी इच्छा आहे,' असं हा तरुण व्हिडिओत म्हणत आहेत. आत्महत्यापूर्वी या तरुणाची आपल्या परिवाराबद्दलची तळमळ आणि प्रेम पाहून व्हिडिओ पाहणाऱ्यांनाही गहिवरुन येतं. दरम्यान, सध्याची तरुणाई आर्थिक विवंचनेतून किंवा नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे.

pimpri chinchwad  a young man ended his life
Mumbai : गर्लफ्रेंडच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, प्रायव्हेट पार्टला इजा करत नराधमानं व्हिडिओ काढला; मुंबई हादरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com