Pune News : फिरायला गेले, क्षुल्लक कारणावरुन मित्रालाच कारमध्ये संपवलं, मृतदेह लोणावळ्यात फेकला; मुळशीत धडकी भरवणारं हत्याकांड

Mulshi Youth Murder in Car : सोनू आणि त्याचे मित्र शुभम यादव, अमर मोरे, आशिष चव्हाण आणि एका अल्पवयीन तरुणासह मुळशीमध्ये फिरायला गेले होते.
Mulshi Youth Murder in Car
Mulshi Youth Murder in Car Saam Tv News
Published On

पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यातल्या त्यात याचं प्रमाण पुणे शहर आणि जिल्ह्यात जास्त प्रमाणात दिसत आहे. अशातच मुळशीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुळशी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हानिफ अली सहाजमाल शेख उर्फ सोनू (रा. आजिवली, खालापूर, रायगड) असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार मित्रांविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनू आणि त्याचे मित्र शुभम यादव, अमर मोरे, आशिष चव्हाण आणि एका अल्पवयीन तरुणासह मुळशीमध्ये फिरायला गेले होते. मुळशीतील एका गोशाळेच्या शेडमध्ये सोनू आणि आशिष यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी लोखंडी हातोड्यांनी एकमेकांवर हल्ला केला.

Mulshi Youth Murder in Car
Mumbai : गर्लफ्रेंडच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, प्रायव्हेट पार्टला इजा करत नराधमानं व्हिडिओ काढला; मुंबई हादरली

यानंतर सर्वजण कारमध्ये बसले, तेव्हा चौघांनी मिळून सोनूवर सामूहिक हल्ला केला. टॉवेल आणि शर्टचा वापर करून त्यांनी सोनूचा गळा आवळून त्याची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह लोणावळ्याजवळील दुधीवरे गावाच्या खिंडीतील जंगलात फेकून दिला. सोनू घरी न परतल्यानं त्याच्या पत्नीने वावोशी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी चारही मित्रांना ताब्यात घेतलं. शुभम यादवच्या माहितीवरून पोलिसांनी दुधीवरे गावालगतच्या जंगलात सोनूचा मृतदेह शोधला. मृतदेहावर गळ्याभोवती कपडे बांधलेले, तोंडाला टॉवेल गुंढाळलेले आणि शर्टाने गळा आवळल्याचं आढळलं.

Mulshi Youth Murder in Car
Pune News : ८५ वर्षीय आजोबांना विवाहाची इच्छा; जाहिरात पाहून महिलेशी संपर्क, पण वरमाला पडण्यापूर्वीच झाली गफलत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com