Crime News Saam TV
क्राईम

Beed News : तुमचे पैसे दुप्पट करून दोतो; खोटं आश्वासन देत महिलेची 32 लाखांची फसवणूक

Beed Crime News : तुम्ही ऑनलाईन रक्कम गुंतवल्यानंतर तुम्हाला त्याचा जास्तीचा फायदा करून देतो, असे संबंधितांनी सांगितले होते. त्यानंतर मुंडे यांनी या आमिषापोटी 32 लाख 69 हजार 514 रूपयांची गुंतवणूक केली.

साम टिव्ही ब्युरो

Beed :

बीडच्या परळीमधून चोरीची मोठी घटना समोर आली आहे. कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळवून देतो, असे आमिष दाखवून 32 लाख 69 हजार 514 रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आलाय. या प्रकरणात बीडच्या सायबर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, परळी शहरातील विद्या वैजीनाथ मुंडे या महिलेस 9004811291 या क्रमांकावरून फोन आला होता. तुम्ही ऑनलाईन रक्कम गुंतवल्यानंतर तुम्हाला त्याचा जास्तीचा फायदा करून देतो, असे संबंधितांनी सांगितले होते. त्यानंतर मुंडे यांनी या आमिषापोटी 32 लाख 69 हजार 514 रूपयांची गुंतवणूक केली.

ही गुंतवणूक टेलीग्राम लिंकच्या आधारे पाठवण्यात आली होती. बरेच दिवस झाले मात्र या गुंतवणुकीवर त्यांना कोणताही मोबदला मिळला नाही. तसेच त्यांनी जी रक्कम गुंतवलीये ती देखील परत मिळाली नाही. वारंवार पैसे परत मागून मिळत नव्हते. त्यावर आपली यात फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत सायबर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नागपूरमध्ये चोरांचा सुळसुळाट

नागपूरमध्ये देखील चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील गुमथाळा गावानजीक असलेल्या शर्मा फॅब्रिकेटर इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीत चोरी झाली आहे. यामध्ये वेल्डिंग मशीन, कटर मशीनसह इतर साहित्य चोरीला गेले होते.

मागील काही महिन्यांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपी राजेश शाहू, सुरज तीवारी, राहूल मेश्राम, अभिजीत चव्हाण या चारही आरोपींना नागपूर ग्रामीणच्या गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

Crime: परदेशातून यायचा, 10 वर्षाच्या बालिकेला दारू पाजून अत्याचार करायचा, आईच मुलीला नराधम म्हाताऱ्याकडे सोडायची

Maharashtra Live News Update: कोंढवा गोळीबार प्रकरण; पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली

Navi Mumbai Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; ५२७ कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाच्या तारखा

SCROLL FOR NEXT