Rape Saam Tv
क्राईम

Aurangabad Crime News: औरंगाबाद हादरलं! अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी केला अत्याचार

Crime in Aurangabad: औरंगाबाद पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींपैकी एकाला त्यांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.

Saam Tv

Aurangabad Crime: बिहारमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. बिहारच्या औरंगाबाद जिह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सदर घटनेचे गांभीर्य जाणून तडक कारवाई केली आहे. या प्रकरणी त्यांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध स्थानिक पोलीस घेत आहेत. ही घटना फेसर पोलीस स्थानकाच्या परिसरामध्ये घडली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पांडे यांनी या प्रकरणाची माहिती माध्यमांना दिली आहे. "घडलेली घटना फेसर स्थानकाच्या क्षेत्रात घडलेली आहे. या क्षेत्रातल्या एका गावात पीडित अल्पवयीन मुलगी राहते. गुन्हातील आरोपी हे मुलीच्या गावचे आहेत. पोलिसांनी लगेच कारवाई करत दोन संशयित आरोपींपैकी एकाचा पकडले. तर दुसरा आरोपी अजूनही फरार आहे", असे संजयकुमार यांनी म्हटले.

पोलिसांनी घटनास्थळीचा व्यवस्थित तपासणी केल्याचे एसडीपीओ संजयकुमार यांनी सांगितले. त्यांनी सामूहिक बलात्कार करणारे अपराधी हे पीडित मुलीच्या गावात राहणारे दोन तरुण असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाव घेत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी मुलीला जिह्यातील रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहितीही संजयकुमार पांडे यांनी दिली आहे.

प्राथमिक तपास झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी संशयित आरोपीला पकडले. आता दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे शर्थचे प्रयत्न सुरु आहेत. वैद्यकीय चाचणीनंतर वैद्यकीय अहवाल तपासून पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT