arjuni morgaon police charged wife for hitting husband Saam Digital
क्राईम

मुलाच्या अंत्यविधीपूर्वी धक्कादायक माहिती आली समाेर, कुटुंबियांना बसला माेठा धक्का;सूनेस अटक

arjuni morgaon police charged wife for hitting husband: पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मेघशाम झोपेत असताना वैशालीने त्यांचा गळा आवळुन खून केल्याचे कबूल केले आहे.

Siddharth Latkar

- शुभम देशुमख

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नजकीच्या ईसापुर येथे पतीचा गळा आवळुन पत्नीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीवर (कलम 302) खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हत्येमागचं नेमक कारण काय ? याचा तपास मोरगांव अर्जूनी पोलिस करीत आहेत.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मेघशाम भावे व त्यांचे कुटुंबीय रात्री जेवण करुन झोपी गेले हाेेते. सकाळी मेघशाम उठले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी ते का उठले नाहीत हे पाहण्यासाठी गेले. त्यांनी मेघशाम यांना उठविण्याचा प्रयत्न केला. काेणतीच हालचाल न झाल्याने त्यांनी मेघशामला स्पर्श केला. त्यावेळी त्यांचे शरीर थंड पडल्याचे लक्षात आले.

मेघशाम यांचे निधन झाल्याचे समजून कुटुंबियांनी नातेवाईकांना कळविले. बुधवारी (ता.12) दुपारी अंत्यविधी पूर्वी मेघशामला आंघोळीसाठी आणले असता त्याच्या गळ्यावरती गळफास सारखी काळ्या रंगाचे निशाण कुटुंबियांना दिसले.

हि बाब आई -वडिल आणि नातेवाईकांनी पाेलिसांना कळवली. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मेघशाम भावेंचे घर गाठले. तेथे पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तसेच संशयावरुन पत्नी वैशालीला ताब्यात घेत तिची चौकशी केली. वैशालीने मेघशामचा गळा आवळुन हत्या केल्याची कबुली पाेलिसांना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: वेळेवर हॉल उपलब्ध न करून दिल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड|VIDEO

Maharashtra Twins Birth : ९ महिन्यात ४२ जुळी मुलं, बीडमध्ये का वाढतेय जुळ्या मुलांची संख्या? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Crime: भयंकर! तोकडे कपडे घातल्याचा राग, भावाने ३३ वर्षांच्या बहिणीला संपवलं

Maharashtra Live News Update : मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणीला सुरूवात

SCSS Scheme: फक्त व्याजातून कमवा २ लाख ४६ हजार रुपये; योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT