अमरावतीमध्ये आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यामुळे आईने हे संतापजनक कृत्य केले. अमरावती जिल्ह्यातील आसेगाव शेतशिवारात ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणात दत्तापूर पोलिसांनी तपासचक्राला गती देत चौघांविरोधात गु्न्हा दाखल करत त्यांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे (वय २६ वर्षे, रा. नारगावंडी) असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दत्तापूर येथील मनोज कीर्तन, हत्या झालेल्या तरुणाची आई दुर्गा गजानन वारंगणे, अमोल सुरेश अर्जुने आणि अशोक उर्फ चिवडा व्यकंटराव चवरे या चौघांना पोलिसांनी अटक केली. गणेशची आई दुर्गाचे मनोज कीर्तने याच्यासोबत प्रेमसंबध होते. या प्रेमसंबंधाची कुणकुण गणेशला लागली होती. त्यामुळे तो त्याच्या आईला हटकत होता.
मुलगा गणेश हा आपल्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने मनोज कीर्तन आणि दुर्गाने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी अमोल अर्जुन आणि अशोक उर्फ चिवडा व्यकंटराव चवरे यांना मदतीला घेण्यात आले. ठरल्याप्रमाणे ७ ऑक्टोबर रोजी सकाळी मनोज कीर्तनने गणेशला आपल्या दुचाकीवर बसवून आसेगाव शेत शिवारातील शीतल गुप्ता यांच्या शेतात नेले. तिथे सर्वांनी मिळून गणेशचे हातपाय बांधून त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला.
गंभीर जखमी झालेल्या गणेशला धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच डॉ. आकाश येंडे यांनी याबाबतची माहिती दत्तापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी सुरूवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. परंतू तपासानंतर ही हत्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतरी दत्तापूर पोलिसानी तपासचक्राला गती दिली. हत्येचा गुन्हा दाखल करून अवघ्या २४ तासांत चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.