Zubeen Garg Death Case: गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी चुलत भावाला पोलिसांनी केली अटक; मनं सुन्न करणारे खुलासे आले समोर

Zubeen Garg Death Controversy: असामचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार जुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणात नवे वळण आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी जुबीन गर्ग यांचा चुलत भाऊ संदीपन गर्ग याला अटक केली आहे.
Zubeen Garg Death Controversy
Zubeen Garg Death ControversySaam Tv
Published On

Zubeen Garg Death Case: असामचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार जुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणात नवे वळण आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी झुबीन गर्ग यांचा चुलत भाऊ संदीपन गर्ग याला अटक केली आहे. राज्य सीआयडी या प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

माहितीनुसार, जुबीन गर्ग यांचा मृतदेह सिंगापूरमध्ये झालेल्या एका यॉट पार्टीदरम्यान समुद्रात सापडला होता. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण बुडून झाल्याचे नमूद करण्यात आले होते, मात्र कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी या निष्कर्षावर शंका व्यक्त केली होती.

Zubeen Garg Death Controversy
Singer Passes Away: आधी बाईकवरुन अपघात, नंतर हार्ट अटॅक; प्रसिद्ध गायकाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

जुबीन गर्ग यांच्या बँडमधील सदस्य शेखर ज्योती गोस्वामी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जुबीन यांना पाण्यात असताना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि ते बुडत असतानाही त्यांच्या मॅनेजरने “जाबो दे, जाबो दे” (“जाऊ दे, जाऊ दे”) असे  गाणं गायल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवा कलाटणी मिळाली आहे.

Zubeen Garg Death Controversy
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाचा झटका; परदेशात जाण्यावर बंदी, ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी दिला निर्णय

जुबीन गर्ग हे प्रशिक्षित जलतरणपटू असल्याने त्यांचा मृत्यू अपघाती नसावा, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या तपास अधिक गतीने सुरू असून, अटकेत घेतलेल्या सर्व संशयितांची चौकशी केली जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा न्यायालयीन चौकशीसह महत्त्वाचा खुलासा होण्याची शक्यता आहे. जुबीन गर्ग यांच्या निधनाने असामचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय संगीतविश्व हदरले होते. त्यांच्या मृत्यूप्रकरणातील नव्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com