amboli police charged 29 tourists from gadhinglaj and sawantwadi  Saam Digital
क्राईम

Amboli Waterfall: आंबाेली घाटात धबधब्यावर पर्यटकांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO बघा!

amboli police charged 29 tourists from gadhinglaj and sawantwadi: पर्यटकांनी सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरड केली. पाेलिसांनी पर्यटकांची धरपकड केली. रात्री दोन्ही गटातील पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

कार पार्किंगच्या वादातून आंबोली घाट धबधबा परिसरात पर्यटकांच्या दोन गटात राडा झाला. या राड्यानंतर पोलिसांनी गडहिंग्लज आणि सावंतवाडी येथील 29 पर्यटकांवर गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा आंबाेली पाेलिस तपास करीत आहेत.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आंबोली येथील मुख्य धबधब्यानजीक रस्त्यावर वाहन लावल्यावरून गडहिंग्लज येथून आलेले पर्यटक आणि सावंतवाडीतील पर्यटकांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर मारामारीत झाले.

तेथे कार्यरत असलेले पाेलिसांनी दोन्ही गटांना हटकले. पाेलिस आल्याचे पाहताच गडहिंग्लज गटातील काही पर्यटकांनी जंगलात पळ काढला. तर सावंतवाडीच्या पर्यटकांनी आंबोली पोलिस दूरक्षेत्रात धाव घेतली.

दाेन्ही गटातील एकूण 29 पर्यटकांवर सार्वजनिक ठिकाणी शांतताभंग करणे, जिल्ह्यात मनाई आदेश असताना त्याचे उल्लंघन करणे, पोलिसांसमक्ष दंगा करणे (भादंवि कलम १६० व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे पुण्यात येऊन करणार पंचनामा, भाजपची करणार पोलखोल

Jobs : राज्यात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,३ लाख पदं रिक्त असल्याची माहिती

Dry Fruits For Skin Glow: काजू, बदाम आणि पिस्ता.. काय खाल्ल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो?

Shaktipith Mahamarg: मोठी बातमी! शक्तिपीठ महामार्गात बदल, आता कोणत्या जिल्ह्यातून आणि कसा जाणार?

Facial Hair Remover: चेहऱ्यावरील नको असलेले केस कसे काढायचे?

SCROLL FOR NEXT