Akola Crime News  Saam tv
क्राईम

Akola Crime News : घरी सोडण्याच्या बहाण्याने शेतात नेत ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार, अकोल्यातील खळबळजनक घटना

Akola Crime News : अकोल्यात वृद्ध महिलेला शेतात नेत अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपी फरार आहेत. अकोला पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

अकोला : अकोला जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. अकोल्यात ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील दाळंबी शेतशिवारात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

७८ वर्षीय वृद्ध महिला अकोल्यावरून एसटी बसने गावाकडे परतत होती. ही वृद्ध महिला दाळंबी येथे राष्ट्रीय महामार्गावर बसमधून वृद्ध महिला उतरली. त्यानंतर दाळंबी गावातून घरी जाताना पीडित वृद्ध महिलेसोबत अत्याचार झाला. मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर रात्री उशीरा बोरगाव मंजू पोलिसांत या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला.

नेमकं काय घडलं?

अकोला बस स्थानकावरून 78 वर्षीय वृद्ध महिला काल दुपारी एसटी-बसनं दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती. दुपारी सव्वा दोन वाजता दाळंबी गावातच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वृद्ध महिला पोचली आणि तिथे उतरली. त्यानंतर गावाकडे पायी निघाली. त्यावेळी तिघे जण दुचाकीने आले, या तिघांनी गावात सोडून देतो, असं सांगत शेतशिवारात घेऊन गेले.

या तिघांपैकी एकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच अत्याचार केल्याचा गुन्हा कोणाला सांगितल्यास, जीवे ठार मारू, अशी धमकीही वृद्ध महिलेला देण्यात आली. या घटनेदरम्यान गावातीलच दोन लोक रस्त्यावरून जात होते. त्यामुळे या वृद्ध महिलेने आरडाओरड सुरू केली. या वृद्ध महिलेचा आवाज कानावर पडतातच दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली. त्यानंतर अत्याचार करणारा व्यक्तीने घटनास्थळावरुन पळ काढला.

गावातील दोन्ही व्यक्तींनी वृद्ध महिलेला सुखरुप घरी सोडलं. त्यानंतर या वृद्ध महिलेने तिच्या सोबत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन गाठलं. या घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार पोलिसांनी गुन्हे दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT