Rajasthan Crime Saam Tv
क्राईम

Crime News: चोरीपूर्वी देवापुढं केला नवस, हाती घबाड लागताच १ लाख केले दान अन् भंडाराही घातला

Rajasthan Crime: राजस्थानमध्ये जबरी चोरीची घटना घडली. चोरांनी चोरी करण्यापूर्वी मंदिरात जाऊन नवस केला. त्यानंतर १२ लाख मिळताच १ लाख मंदिरात जाऊन दान केले आणि ५० हजारांचा प्रसाद देखील वाटला.

Priya More

राजस्थानच्या अजमेरमध्ये चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी चोरी करण्यापूर्वी चोरांनी देवापुढे नवस केला. चोरी यशस्वी झाल्यावर आणि हाती घबाड लागल्यानंतर त्यांनी १ लाख रुपये मंदिरात येऊन दान केले आणि ५० हजार रुपयांमध्ये भंडारा करत लोकांना प्रसाद वाटला. पोलिसांनी तब्बल ९०० किलोमीटर पाठलाग करत चोरांच्या मुसक्या आवळल्या.

चोरीपूर्वी केला नवस -

ही चोरीची घटना राजस्थानच्या अजमेरमधील पुरानी मंडी येथील एका दुकानामध्ये करण्यात आली होती. अजमेर येथील रहिवासी कन्हैया लाल उर्फ काना, महेंद्र आणि हनुमान रेगर या तिघांनी मिळून ही चोरी केली. या तिघांनी दुकान फोडून त्यामधील तिजोरीत असणारे तब्बल १२ लाख रुपये लंपास केले. घटनेपूर्वी मुख्य आरोपी हनुमान रेगर भिलवाडा येथील एका मंदिरामध्ये गेला होता. चोरी करण्यापूर्वी चोरांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि नवस केला. चोरीमध्ये चांगला पैसा मिळाला तर मंदिरामध्ये येऊन १ लाख रुपये दान करून भंडाऱ्याचे आयोजन करेल असा नवस त्यांनी केला होता.

१ लाख रुपये मंदिरात केले दान -

चोरांनी इमानदारी दाखवली. नवस केल्यानंतर त्यांना चोरीतून मोठी रक्कम मिळाली. तब्बल १२ लाख रुपये त्यांना मिळाले. चोरीच्या घटनेनंतर ते मंदिरात गेले आणि त्याठिकाणी १ लाख रुपये दान केले आणि ५० हजार रुपये खर्च करून भंडाराही केला. त्यानंतर तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न फसला पोलिसांनी त्यांना अटक केली.

अशी केली आरोपींना अटक?

पोलिस अधिकारी रुद्रप्रकाश यांनी सांगितले की, पोलिसांच्या पथकाने आरोपींचा ९०० किलो मीटरपर्यंत पाठलाग केला. याशिवाय तब्बल २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर त्यांना तिन्ही चोरांना पकडण्यात यश आले. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, चोरी केलेल्या १२ लाखांपैकी सर्वात मोठा वाटा मुख्य आरोपी हनुमान रेगरने घेतला. त्याने ७ लाख, महेंद्रने ४ लाख आणि कन्हैया लालने १ लाख रुपये घेतले. पोलिसांनी उर्वरित ४ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. अटकेत असलेले तिन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT