
राजस्थानमधील कोटपुतली येथे बोअरव्हेलमध्ये पडून तीन वर्षांची मुलगी जीवनाची लढाई हरली. या मुलीचं नाव चेतना असून तिला बुधवारी बोअरव्हेलमधून बाहेर काढण्यात आलं. २२० तासांनंतर मुलीला बाहेर काढण्यात आलं त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी चेतनाला मृत घोषित करण्यात आलं. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर रोजी राजस्थानमधील कोतपुतली येथील बडियाली गावात राहणारी चेतना नावाची मुलगी बोअरव्हेलमध्ये पडली. या मुलीचं वय फक्त तीन वर्ष. चिमुकली मुलगी बोअरव्हेलमध्ये पडल्याचं समजल्यानंतर प्रशासनाने बचाव कार्य सुरू केलं. एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक सतत मुलीची सुटका करण्यात गुंतले होते. तीन वर्षांच्या चेतनाला वाचवण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले.
तब्बल १० दिवसांपासून बचावकार्य सुरू होते. १० दिवशी चिमुकलीला बाहेर काढण्यात आलं. चिमुकलीला खोल बोअरव्हेलमधून बाहेर काढेपर्यंत तेथील स्थानिक लोक देवाची प्रार्थना करत होते. शेवटी बचाव दलाल यश आलं आणि चिमुकलीला बाहेर काढलं. चिमुकली बाहेर काढताच अनेकांना देवाचे आभार मानले. अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण या आनंदावर डॉक्टरांच्या त्या दोन शब्दांनी विरजण आलं.
या बचाव कार्यात अनेक एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे जवान सहभागी झाले होते. अग्निशमन दल, जेसीबी, नगरपरिषदेचे अनेक कर्मचारीही घटनास्थळी तैनात होते. याशिवाय कोतपुतलीचे एसपी, एएसपी, डीएसपी आणि तीन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. चिमुकली चेतनाला जेव्हा १२० फूट खोल बोअरव्हेलमधून बाहेर काढण्यात आलं, तेव्हा तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.
रुग्णालयात चिमुकलीसाठी वेगळा बेड तयार करण्यात आला होता. चिमुकलीला रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तेव्हा डॉक्टरांनी चेतनाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या मुलीचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच मुलीचा मृत्यू कधी झाला असेल हे समजू शकेल. यासाठी तीन डॉक्टरांची टीम तयार करण्यात आलीय.
दरम्यान राजस्थानमध्ये बोअरव्हेलमध्ये पडून आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना आहे. महिनाभरात दोन घटना घडल्या आहेत. याआधी दौसा येथील रहिवासी असलेल्या पाच वर्षीय आर्यनचाही बोअरव्हेलमध्ये पडून मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.