
Jharkhadn hazaribagh News : झारखंडमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. झारखंडच्या हजारीबागमध्ये बायकोशी वाद झाल्याने युवकाने बाईकसोबत विहिरीत उडी मारल्याची घटना घडली आहे. या युवकाला वाचवताना ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेतील पाचही जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
मीडिया रिपोर्टनुसार, झारखंडच्या हजारीबागच्या चरही प्रखंड गावातील सरबहा परिसरातील ही घटना आहे. दोघांमध्ये घरगुती कारणावरून पती सुंदर करमाली आणि पत्नी रुपा करमाली या दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर पती सुंदर रागाच्या भरात घरातून बाहेर निघाला. सुंदर बाईक घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर या सुंदरने रागाच्या भरात बाईकसोबत विहिरीत उडी मारली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
या भीषण प्रकारानंतर सुंदरला वाचवायला ४ जण धावले. सुंदरने उडी मारल्यानंत चौघांनीही उडी मारली. मात्र, या पाचही जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुंदर, राहुल, सूरज, विनय आणि पंकज असे पाच जणांचे नाव आहे. विनय-पंकज असे दोघे भाऊ आहेत. राहुल हा आई-वडिलांसाठी एकुलता एक मुलगा होता. पाचही जण २५ ते ३० वयोगटातील आहेत.
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी या पाच जणांचे मृतदेह जवळील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना विहिरीजवळ जाण्यास बंदी घातली आहे. गावातील ५ युवकांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.