Nagpur Police
Nagpur PoliceSaam tv

Nagpur Police : मध्यरात्री दोघे स्कुटरवरून जात होते, संशयावरून झडती घेतली; एवढं मोठं घबाड बघून पोलीसही चक्रावले

Nagpur News : नववर्षा उत्सवादरम्यान मद्य प्राशन करून धिंगाणा घालणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त होता नागपूर शहरात नववर्षाच्या सेलिब्रेशनमुळे पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त होता
Published on

पराग ढोबळे 

नागपूर : नववर्षाच्या स्वागतासाठी सर्जन सज्ज झाले असताना या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यात देखील पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली असताना  कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत थर्टी फार्स्टच्या रात्री नाकाबंदी दरम्यान ४१ लाखांची अवैध रोकड जप्त करण्यात आली आहे. 

नववर्षा उत्सवादरम्यान मद्य प्राशन करून धिंगाणा घालणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. नागपूर शहरात नववर्षाच्या सेलिब्रेशनमुळे पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त लावला होता. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून बारकाईने तपासणी करण्यात येत होती. या दरम्यान नागपूरच्या कोतवाली पोलिसांकडून मध्यरात्री शिवाजी पुतळा परिसरात स्कूटरवरून रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले.

Nagpur Police
Shirdi Sai Baba : सर्वसामान्य साईभक्तांना मिळणार व्हीआयपी आरतीचा लाभ; साई मंदिर संस्थानचा नवा उपक्रम

रकमेबाबत कोणतेही कागदपत्र नाही 

प्राथमिक तपासात ही रक्कम हवालाद्वारे आणण्यात आले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिवाजी पुतळ्याजवळ दोन तरुण मोपेडवरून संशयास्पदरीत्या जात असल्याचे दिसून आले. त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात सुमारे ४१ लाख ६७ हजार ३०० रुपयांची रोकड आढळून आली. या रोख रकमे संदर्भात कोणतेही ठोस कागदपत्र सादर करता न आल्याने पोलिसांनी या दोन तरुणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम जप्त केली.  

Nagpur Police
Jalgaon Bribe Trap : वीजचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले एक लाख; लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात

दोघे पोलिसांच्या ताब्यात 

प्राथमिक तपासात ही रोकड हवालाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रोहित गुलाबचंद कोरी आणि संगम रघुवर प्रसाद कोरी नावाचे तरुण हे दोघेही मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी असून त्यांच्याकडे ही रोकड सापडली आहे. दोघांना ताब्यात घेत या प्रकरणात आता कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com