Ahmednagar Breaking News Saamtv
क्राईम

Ahmednagar News: पोटदुखीचा बहाणा, रुग्णालयात नेताना केला पोबारा, सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी जेलमधून फरार; नगरमध्ये खळबळ

Ahmednagar Breaking News: पोटात दुखत असल्याचा बहाणा करत रुग्णालयात घेऊन जात असताना आरोपीने पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडला. या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. २ जून २०२४

शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी कारागृहातून फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोपरगाव येथील कारागृहातील मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 2015 मध्ये शिर्डीत बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजली म्हणून सागर शेजवळ या दलीत तरुणाची हत्या करण्यात आली होती. यातील नऊ आरोपींपैकी योगेश पारधे ( रा. कोल्हार, ता - राहाता, जि - अ.नगर ) हा एक आरोपी सध्या कोपरगाव येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे. आज मध्यरात्री त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला.

योगेश पारधे याने छातीत दुखत असल्याचे सांगत रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती कारागृह प्रशासनाकडे केली. यावेळी रुग्णालयात नेत असताना ड्युटीवरील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

दरम्यान, यापूर्वी कोपरगाव कारागृहात आरोपींकडे मोबाईल सापडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता जेलमधून थेट आरोपीच पळून गेल्याने कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून आरोपीला लवकरात लवकर शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT