Gujarat Crime News Saam Tv
क्राईम

Shocking: बॉयफ्रेंडसोबत मिळून नवऱ्याला मारलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनखाली गाडले; तिथेच जेवण बनवून जेवायची बायको

Gujarat Crime News: गुजरातमधून एका भयंकर हत्याकांडाची घटना समोर आली आहे. महिलेने नवऱ्याची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते किचनखाली गाडले. बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राच्या मदतीने तिने नवऱ्याला संपवलं.

Priya More

Summary -

  • गुजरातमधील अहमदाबाद येथे बायकोने नवऱ्याची हत्या केली

  • अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने घेतला जीव

  • बायफ्रेंड आणि त्याच्या मित्राच्या मदतीने नवऱ्याला संपवलं

  • १४ महिन्यांनंतर पोलिस तपासातून हे भयंकर हत्याकांड उघड

उत्तर प्रदेशच्या मेरठची मुस्कान आणि मध्य प्रदेशच्या इंदुरची सोनम रघुवंशी यांनी नवऱ्याला भयंकर मृत्यू दिला. या घटना ताज्या असताना आता गुजरातमधील रुबीने सर्वांना हादरवून टाकले आहे. गुजरातमधील अहमदाबादमधून एक खळबळजनक हत्या प्रकरण समोर आले आहे. रूबीने 'दृश्यम' स्टाईल पतीची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून घरातील किचनखाली पुरले. त्याठिकाणीच जेवण बनवून ती तिथेच जेवायची. ही घटना समोर येताच सर्वांना धक्का बसला.

रुबीचा नवरा गेल्या वर्षभरापासून बेपत्ता होता. जेव्हा जेव्हा शेजारी राहणारे नागरिक आणि नातेवाईक रुबीला त्याच्याबद्दल विचारायचे तेव्हा ती म्हणायची की तो कामासाठी दुबईला गेला आहे. काही महिन्यांनंतर रुबी आपल्या नवऱ्याच्या घरी जात असल्याचे सांगून निघून गेली. या घटनेत काही तरी गोष्टी संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी महिलेच्या घरी धाव घेतली आणि किचनमधील टाइल्स काढून खोदकाम केल्यानंतर रुबीच्या बेपत्ता नवऱ्याच्या मृतदेहाचे अवशेष सापडले.

रुबीने तिचा बॉयफ्रेंड आणि त्याच्या २ मित्रांच्या मदतीने नवरा समीर अन्सारीची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये खड्डा खोदून त्यामध्ये पुरले होते. त्यानंतर तिने सिमेंट आणि टाइल्स लावून घेतल्या होत्या. इतकेच नाही तर रुबी पुढील अनेक महिने तिच्या मुलांसह एकाच घरात राहिली आणि त्याच किचनचा वापर करत होती. तिथे ती जेवण बनवून खायची देखील. रुबीने नवऱ्याची हत्या केल्याचे प्रकरण असे दाबून ठेवले की १४ महिन्यांपर्यंत कोणालाही काहीच माहिती मिळाली नाही.

३ महिन्यांपूर्वी अहमदाबाद क्राईम ब्रांचला गुप्त माहिती मिळाली होती की, फतेवाडी येथे राहणारा समीर अन्सारी बेपत्ता आहे. तो बेपत्ता असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिस तपासात असे दिसून आले की, समीरचा मोबाईल गेल्या १४ महिन्यांपासून बंद होता. तो त्याच्या ओळखीच्या कुणाच्याही संपर्कात नव्हता किंवा इतक्या दिवसांपासून कोणीही त्याला पाहिले नव्हते. या सर्व तथ्यांमुळे पोलिसांचा संशय वाढला. त्यानंतर त्यांनी तपासाची चक्र फिरवली.

बुधवारी पोलिस तपासातून समोर आले की, १४ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या समीर अन्सारीची हत्या त्याच्या बायकोने केली. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने रुबीने हे टोकाचे पाऊल उचलले. रुबीचा बॉयफ्रेंड आणि त्याचे दोन मित्र साहिल आणि फैजू हे देखील या हत्याकांडात सहभागी होते. पोलिसांनी इम्रानला अटक केली असून उर्वरीत आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिस तपासातून हे देखील समोर आले ही, इम्रान आणि त्याच्या मित्रांनी समीरची हत्या त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून केली होती. चौघांनी मिळून या हत्याचा कट रचला होता. रूबीने ज्या नवऱ्याची हत्या केली होती त्याच्यासोबत तिने प्रेमविवाह केला होता.

पोलिसांनी सांगितले की, हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव समीर अन्सारी असे होते. तो मूळचा बिहारचा रहिवासी होता. जो अनेक वर्षांपासून येथे राहत होता आणि गवंडी म्हणून काम करत होता. समीरची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी आधी समीरचे हातपाय बांधले. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुत किचनमध्ये गाडले. संशय येऊ नये त्यासाठी सिमेंट टाकून त्यावर टाइल्स लावल्या. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी रुबीच्या घरातील किचनमध्ये खोदकाम केलं. त्याठिकाणी समीरच्या मृतदेहाचे तुकडे मिळाले. या हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

Aadhaar-Pan Linking: हे काम आताच करा, अन्यथा ३१ डिसेंबरला येणार नाही पगार

SCROLL FOR NEXT