Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Crime News: वर्ध्यात एक धक्कादायक घटना घडलीय. बीसीए विद्यार्थिनीची तिच्याच मित्राने गळा दाबून हत्या केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि तपास सुरू केला आहे.
Crime News
Wardha: BCA student found dead in hostel room; friend accused of strangling her.Saam tv
Published On

एका तरुणीची तिच्याच मित्राने गळा दाबून हत्या केल्याची घटना वर्धा शहरातील सावंगी मेघे येथे घडलीय. सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीसीएच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या मुलीची तिच्याच मित्राने हत्या केलीय. दरम्यान हत्येची माहिती मिळताच वर्धा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला असून तरुणीची मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलाय. हत्येच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Crime News
Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही विद्यार्थिनी राहत होती. ती बीसीएच्या प्रथम वर्षाला शिकत होती. तिची हत्या तिच्याच एका मित्राने केलीय. मारेकरी हा या तरुणीच्या रूमवर गेला होता. तेथे त्याने तिचा गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर तरुणीता मोबाईल घेऊन पळ काढला.

Crime News
Crime News: पुणे, बीडनंतर आता लातूरमध्ये गुंडाराज;भरचौकात तरुणावर तलवारीनं हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

प्राथमिक माहितीनुसार, हत्या करणारा तरुण आणि मृत तरुणी हे दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दोघेही एकमेकांना ओळखत होते. मृत विद्यार्थिनीने लग्नासाठी तगादा लावल्यानं मुलाने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलंय. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

लातूरमध्ये ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

लातूरमध्ये एका ९ वर्षी मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय. मेडिकल दुकानदाराने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सध्या पीडित मुलीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दत्ता चिमन्नशेट्टे (वय वर्ष ५२)असे आरोपीचे नाव आहे. २ नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीनं खोटा बहाणा करून चिमुकलीला मेडिकलच्या वरच्या खोलीत नेले. त्यानंतर चिमुरडीवर अत्याचार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com